himachal pradesh political crisis six mlas declare cease with immediate effect by assembly speaker kuldeep singh pathania 
देश

Himachal Pradesh Political Crisis : काँग्रेसच्या सहा बंडखोर आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी केलं अपात्र!

विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी या आमदारांना तात्काळ प्रभावानं अपात्र ठरवलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीत पक्षादेश धुडकावून लावत भाजपच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या ६ बंडखोर आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलं आहे. पक्षांतरबंदी कायद्याच्या आधारे त्यांच्यावर ही अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी सांगितलं. (himachal pradesh political crisis six mlas declare cease with immediate effect by assembly speaker kuldeep singh pathania)

३० पानी आदेश काढला

हिमाचल प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी सांगितलं की, "पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत काँग्रेसच्या ६ आमदारांविरोधात कारवाईबाबतची याचिका माझ्याकडं आली होती. यामध्ये ६ आमदार ज्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली पण त्यांनी पक्षाचा व्हिप मानला नाही आणि राज्यसभा निवडणुकीत दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केलं. त्यामुळं त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळं आता ते हिमाचल प्रदेश विधानसभेचे सदस्य नाहीत. याबाबत मी ३० पानी आदेशात सविस्तर माहिती दिली आहे"

पूर्ण युक्तीवादाची दिली संधी

जेव्हा काल माझ्याकडं पक्षांतरबंदी कायद्याच्या दहाव्या सुचीनुसार आलेल्या याचिकेवर सविस्तर सुनावणी झाली. संध्याकाळी ४ वाजता सुनावणी सुरु होऊन ती संध्याकाळी ६ वाजता संपली. यामध्ये मी या आमदारांच्या वकिलांना पूर्ण युक्तीवादाची संधी दिली.

पक्षानं व्हिप बजावलेला असताना त्यांनी तो धुडकाऊन लावला आणि मतदानासाठी सभागृहात उपस्थित नव्हते. काल सुद्धा जेव्हा फायनान्स बिल विधानसभेत सादर करण्यात आलं आणि पास झालं पण तेव्हाही हे आमदार सभागृहात उपस्थित नव्हते, असंही यावेळी पठानिया यांनी सांगितलं. (Latest Marathi News)

तात्काळ प्रभावानं केलं अपात्र

त्यामुळं पक्षांतरबंदी कायद्यानुसार अनुच्छेद १ मधील 'अ' या उपकलमानुसार काँग्रेसच्या ६ आमदारांना तात्काळ प्रभावानं अपात्र ठरवलं आहे. त्यामुळं आता हे आमदार या सभागृहाचे सदस्य असणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT