Himachal Pradesh esakal
देश

Himachal Pradesh : 'हिमाचल'वरचं संकट टळलं नाही? कॅबिनेट बैठक अर्ध्यावर सोडून मंत्री गायब; अपात्र आमदारांची घेतली भेट

Himachal Pradesh Politics News : हिमाचल प्रदेशमध्ये राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. सध्या काँग्रेसने शिताफीने हे संकट माघारी पाठवलेलं असलं तरी अजून संघर्ष संपल्याचं दिसून येत नाही. कारण कॅबिनेट बैठक अर्ध्यावर सोडून एक मंत्री अपात्र आमदारांना भेटायला निघून गेल्याची घटना घडली आहे.

संतोष कानडे

Himachal Pradesh Politics (Marathi News) : हिमाचल प्रदेशमध्ये राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. सध्या काँग्रेसने शिताफीने हे संकट माघारी पाठवलेलं असलं तरी अजून संघर्ष संपल्याचं दिसून येत नाही. कारण कॅबिनेट बैठक अर्ध्यावर सोडून एक मंत्री अपात्र आमदारांना भेटायला निघून गेल्याची घटना घडली आहे.

हिमाचल प्रदेशात राज्यसभा निवडणुकीदरम्यान विरोधी भाजपच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या सहा आमदारांना विधानसभेचे अध्यक्ष कुलदीपसिंह पठानिया यांनी गुरुवारी निलंबित केले. पक्षाचा व्हिप झुगारून हे सहा आमदार विधिमंडळामध्ये अर्थसंकल्प मंजूर होत असताना देखील अनुपस्थित राहिले होते. यामुळेच त्यांना निलंबित केले जावे, अशी मागणी सत्ताधारी काँग्रेसकडून करण्यात आली होती.

हिमाचल प्रदेशमध्ये गुरुवारी कॅबिनेट बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये उपस्थित असलेले विक्रमादित्य सिंह हे सायंकाळी साडेसहा वाजता बैठक सोडून निघून गेले. राज्याच्या गुप्तचर विभागाने ते कुठे गेले याबाबत माहिती दिली आहे. विक्रमादित्य हे बैठक सोडून चंदीगडला गेले आणि तिथे त्यांनी सहा अपात्र आमदारांसोबत चर्चा केली. या बातमीमुळे राजकीय धुरळा अजून शांत झालेला नाही, हे दिसून येतंय.

विक्रमादित्य यांनी अद्याप आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही. परंतु ते पक्षात राहणार की दुसरा निर्णय घेणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. गुरुवारी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी त्यांच्या निवासस्थानी काँग्रेस आमदारांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीलाही विक्रमादित्य सिंह यांच्यासह चार आमदार बैठकीपासून परावृत्त राहिले होते. विक्रमादित्य आणि अपात्र झालेले सहा आमदार दिल्लीमध्ये पोहोचू शकतात, असं सांगितलं जात आहे.

अपात्र झालेले आमदार कोणते?

राजिंदर राणा, सुधीर शर्मा, इंदरदत्त लखनपाल, देविंदरकुमार भुत्तो, रवी ठाकूर आणि चैतन्य शर्मा अशी निलंबित करण्यात आलेल्या आमदारांची नावे आहेत. विधानसभाध्यक्षांच्या निर्णयाविरोधात निलंबित आमदारांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. या आमदारांवरील निलंबनाच्या कारवाईमुळे आता सभागृहातील सदस्यांची संख्या ६८ वरून ६२ पर्यंत आली असून काँग्रेसची सदस्य संख्या ४० वरून ३४ वर झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT