Himachal Pradesh Politics esakal
देश

Himachal Pradesh Politics : अखेर 'त्या' ९ आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश; हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला धक्का

Himachal Pradesh Politics : हिमाचल प्रदेशातील राजकीय संघर्षामध्ये शनिवारी काँग्रेसला मोठा फटका बसला. नऊ आमदारांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये काँग्रेसच्या अपात्र ठरविण्यात आलेल्या सहा आणि राजीनामा दिलेल्या तीन अपक्षांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Himachal Pradesh Politics : हिमाचल प्रदेशातील राजकीय संघर्षामध्ये शनिवारी काँग्रेसला मोठा फटका बसला. नऊ आमदारांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये काँग्रेसच्या अपात्र ठरविण्यात आलेल्या सहा आणि राजीनामा दिलेल्या तीन अपक्षांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यामध्ये सुखविंदरसिंह सुक्खू यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यापासून विकासकामेच थांबली असल्याचा आरोप बंडखोरांनी केला आहे. या बंडखोर आमदारांनी केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर, हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर, राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह आणि राज्य प्रभारी राजीव बिंदाल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

या सर्व नेत्यांचे स्वागत करताना मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले,‘‘ या आमदारांच्या आगमनामुळे भाजप आणखी मजबूत होईल. विद्यमान राज्य सरकार लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याने जनतेमध्ये मोठा क्षोभ आहे. यातील काँग्रेसच्या सहा आमदारांनी राज्यसभा निवडणुकीच्यावेळी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता त्यांच्या या कृतीमधून जनतेच्या मनातील रागाची भावनाच दिसून येते.’’

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांमध्ये सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजिंदर राणा, इंदरदत्त लखनपाल, चैतन्य शर्मा आणि देविंदरकुमार भुत्तो यांचा समावेश आहे. या सर्वांना पक्षाचा आदेश न पाळल्याने अपात्र ठरविण्यात आले होते. आशिष शर्मा, होशियार सिंह आणि के.एल. ठाकूर या अपक्ष आमदारांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राजीनामा दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT