नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशात सध्या वेगानं राजकीय घडामोडी घडत आहेत. यामध्ये भाजपच्या 15 आमदारांवर विधानसभा अध्यक्ष कुलदीपसिंह पठाणीया यांनी निलंबनाची कारवाई केली आहे, यामध्ये विरोधीपक्ष नेते राम ठाकूर यांचाही समावेश आहे. तर दुसरीकडं काँग्रेसचे नेते विक्रमादित्य सिंह यांनी राजीनामा दिला आहे. (Himachal Pradesh Speaker suspends 15 BJP MLAs including leader of opposition Jai Ram Thakur adjourns House)
भाजप आमदारांना का केलंय निलंबित?
हिमाचल प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठाणीया यांनी सांगितलं की, निलंबित करण्यात आलेले भाजपचे आमदार सभागृहात वारंवार गोंधळ घालून कामकाजात अडथळा आणत होते. त्याचबरोबर त्यांच्याकडून सातत्यानं घोषणाबाजी सुरु होती. त्यामुळं कामकाज थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्यात आली आहे. (Marathi Tajya Batmya)
हिमाचलमध्ये नेमकं काय सुरुए?
हिमाचल प्रदेशात नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि जेष्ठ विधीज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांचा पराभव झाला. विधानसभेत पुरेसं संख्याबळ असतानाही सिंघवी यांचा पराभव झाल्यानं काँग्रेसला धक्का बसला आहे. पण काँग्रेसच्या ६ आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यानं अर्थात भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्यानं सिंघवींचा पराभव झाला.
पण या क्रॉस वोटिंगमुळं हिमाचल काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. याचा फायदा घेण्यासाठी भाजपनं अर्थात विरोधी पक्ष नेत्यांनी आपल्या आमदरांसह राज्यपालांची सकाळी भेट घेतली आणि विधानसभेत सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याची विनंती केली. (Latest Marathi News)
तर दुसरीकडं काँग्रेसचे मुख्यमंत्री सुख्की यांच्यावर नाराजी असल्यानं माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि काँग्रेसचे आमदार विक्रमादित्य सिंह यांनी आपला राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांवर अनेक आरोपही केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.