शिमला : हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात शाळेची बस (School Bus) दरीत कोसळून जवळपास 16 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मदत आणि बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. या अपघातानंतर मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी 50,000 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. (Himachal School Bus Accident News In Marathi)
या घटनेनंतर पंतप्रधानांनी ट्वीट करत दुःख व्यक्त केले आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे झालेला बस अपघात हृदय हेलावणारा आहे. या दु:खद प्रसंगी माझ्या भावना शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत. या अपघातात जखमी लवकरात लवकर बरे होतील अशी आशा पंतप्रधान मोदींकडून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच स्थानिक प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सकाळी 8.30 वाजता झालेल्या या अपघातात शाळकरी मुलांसह 16 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बसमध्ये 40 ते 50 जण होते. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. आशुतोष गर्ग यांनी सांगितले की, सैंजला जाणारी बस जंगला गावाजवळ सकाळी 8.30 च्या सुमारास दरीत कोसळली. जिल्हा अधिकारी आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.