Himalayan glaciers melting report of Standing Committee Parliament Lok Sabha sakal
देश

Himalayan Glacier : हिमालयातील हिमनद्या वितळताहेत!

संसदेच्या स्थायी समितीचा अहवाल लोकसभेत सादर

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : हिमालयातील विविध प्रदेशातील हिमनद्या वितळत आहेत, अशी माहिती सरकारतर्फे आज देण्यात आली. संसदेच्या स्थायी समितीचा यासंदर्भातील अहवाल बुधवारी लोकसभेत मांडण्यात आला.

हवामान बदलामुळे हिमनद्या वितळत असून त्यामुळे केवळ हिमालयातील नदी प्रणालीवरच विपरित परिणाम होणार नसून नैसर्गिक आपत्तींमध्येही वाढ होईल, असेही अहवालात म्हटले आहे.

‘देशातील हिमनद्यांचे व्यवस्थापन-हिमनद्या/सरोवरांची देखरेख, हिमालयातील अचानक येणारे पूर(फ्लॅश फ्लड)’ हा अहवाल संसदेच्या स्थायी समितीने सादर केला. सरकारतर्फे समितीला उत्तर देण्यात आले. सातत्याने वितळणाऱ्या हिमनद्या आणि मागे सरकणाऱ्या हिमनद्यांची समस्या विशद करताना जलसंपदा, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने सांगितले,

की भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाने नऊ हिमनद्यांवरील वस्तुमान संतुलन अभ्यासाचे मूल्यांकन करून त्यांच्या वितळण्याचा अभ्यास केला आहे. त्याचप्रमाणे ७६ हिमनद्यांचे मागे हटणे किंवा प्रवाहाच्या पुढे जाण्याचेही निरीक्षण देखील केले आहे. हिमालयातील विविध प्रदेशात निरीक्षण केलेल्या हिमनद्यांपैकी बहुसंख्य हिमनद्या वितळत आहेत किंवा त्या मागे हटत आहेत, असेही विभागाने नमूद केले.

हिमनद्या वितळत असल्याचा केवळ हिमालयातीलच नदी प्रणालीवर गंभीर परिणाम होणार नसून त्यामुळे दरडी कोसळणे, हिमस्खलन यासारख्या आपत्तींचे प्रमाणही वाढू शकते. त्याचप्रमाणे, हिमनद्या वितळल्याचा परिणाम हिमालयातील वृक्षरेषेवर तसेच वनस्पतींच्या वर्तनावरही होऊ शकतो, असा इशाराही विभागातर्फे देण्यात आला आहे.

याचा परिणाम हिमालयात राहणाऱ्या लोकांच्या उपजीविकेवर तसेच नदीकाठच्या लोकसंख्येवरही होऊ शकतो. जैवविविधता संवर्धन आणि हिमालयाच्या परिसंस्था सेवेवरही हिमनद्या वितळण्यामुळे नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

दरम्यान, संसदेच्या स्थायी समितीने शेजारील देशांबरोबर जलविज्ञानविषयक माहितीची देवाणघेवाण होत नसल्याकडेही लक्ष वेधले आहे. हिमनद्यासंदर्भातील डेटाची देवाणघेवाण करण्याबाबत शेजारील देशांशी कोणताही करार करण्यात आलेला नाही, असेही नमूद केले आहे.

प्रादेशिक सहकार्याची गरज

हिमनदीशी संबंधित पूर आणि जल व्यवस्थापन आव्हाने या दोन्हींचा प्रभावीपणे सामना करू शकणारे सर्वसमावेशक आणि समन्वित धोरण आखण्यासाठी प्रादेशिक सहकार्य ही काळाची गरज असल्याचेही समितीने म्हटले आहे.

त्यामुळे या समितीने जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाला हे प्रकरण परराष्ट्र मंत्रालयाकडे नेण्याची शिफारस केली आहे, ज्यामुळे शेजारच्या हिमालयीन देशांसोबत काही प्रकारचे द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय करार करावे लागतील.

हिमालयात थंड दिवसांत घट

गेल्या ५० वर्षांत हिमालयातील थंड दिवस व थंड रात्रींमध्ये लक्षणीय घट झाल्याने हिमालय कमी थंड झाल्याबाबत स्पष्टीकरण देताना जलसंपदा, नदीविकास विभागाने सांगितले, की पर्यावरण मंत्रालयाच्या माहितीनुसार हवामान बदलाच्या अभ्यासात हिमालयाच्या सध्याच्या हवामानात सातत्याने तापमानवाढ नोंदविली गेली आहे. जम्मू आणि काश्मीर व हिमाचल प्रदेशच्या १६ स्थानकांच्या नोंदीतून उबदार दिवस वाढत असून थंड दिवस कमी होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT