Uttarakhand Assembly Election 2022 : उत्तराखंडमध्ये येत्या विधानसभेच्या 70 जागांसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. त्यापूर्वी येथील प्रचार चांगलाच शिघेला पोहचला असून, प्रचारादरम्यान अनेक राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर शाब्दीक आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या प्रचारादरम्यान उत्तराखंडमधील रॅलीदरम्यान आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा शर्मा यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमधील रॅलीदरम्यान, बिस्वा यांनी काँग्रेस पक्षासह राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. (Himanta Biswa Sarma Controversial Statement On Rahul Gandhi)
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी भारतीय लष्कराने पठाणकोटमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकबाबतचा पुरावा देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला बिस्वा यांनी प्रतिउत्तर दिल आहे. बिस्वा म्हणाले की, भाजपने राहुल गांधी यांच्याकडे ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे चिरंजीव असल्याचा पुरावा कधी मागितला आहे का? असा प्रतिप्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, बिस्ना यांच्या या विधानानंतर देशातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.