देश

Congress : ''पक्षातले काही लोक प्रभू श्रीरामांचा द्वेष करतात'' काँग्रेस नेत्याच्या विधानानंतर आसामचे मुख्यमंत्री म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी शुक्रवारी काँग्रेसलाच घरचा आहेर देत काँग्रेसमधले काही नेते प्रभू श्रीरामांचा द्वेष करतात, असं विधान केलं आहे. त्यानंतर राष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या प्रकरणावर भाष्य केलंय.

काय म्हणाले आचार्य प्रमोद कृष्णम?

एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले की, जो प्रभू श्रीरामांचा द्वेष करतो तो हिंदू असू शकत नाही. राम मंदिराचे बांधकाम रोखण्याच्या प्रयत्नांबद्दल सर्वांनाच माहिती आहे. काँग्रेसचा सदस्य असण्याचा अर्थ नाही की सत्य बोलू नये. माझ्या लक्षात आलेय की, काँग्रेसचे काही नेते प्रभू श्रीराम आणि राम मंदिराचा द्वेष करतात.

आचार्य कृष्णम यांचा व्हिडीओ शेअर करत आसाम राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हिमंता सरमा यांनी म्हटले की, आचार्यांबद्दल मला सहानुभूती आहेत. आता काँग्रेसवाले त्यांना शिव्या देतील. निवडणुकीमध्ये काँग्रेस नेते तथाकथित हनुमान भक्त रामजन्मभूमी सोडून प्रत्येक मंदिरामध्ये जाताना दिसतील. परंतु ते राम मंदिरात कधी जातील? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी दाखल

Mumbai News: ठाकुर्ली कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक मंदावली

हॉटेलमध्ये सेक्स केल्यानंतर अति रक्तस्त्राव होऊन तरूणीचा मृत्यू; बॉयफ्रेंड 2 तास ऑनलाईन उपाय शोधत होता

Ruturaj Gaikwad: BCCI चा ऋतुराजसाठी मोठा प्लॅन; ...म्हणून T20I मालिकेत टीम इंडियात दिले नाही स्थान; कारण ऐकून खूश व्हाल

Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीर विनायक सावरकरांविरोधातील वक्तव्य राहुल गांधी यांना भोवल नाशिक न्यायालयाने बजावला समन्स

SCROLL FOR NEXT