Lucknow News: योगगुरू स्वामी रामदेव यांनी केलेलं एक विधान चर्चेत आलं आहे. जर मी देशाऐवजी व्यापाराचा विचार केला असता तर इलॉन मस्कपेक्षा जास्त श्रीमंत झालो असतो, असं रामदेवबाबा लखनऊ इथल्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले आहेत.
बाबा रामदेव म्हणाले, "जे ज्ञान मला वेद, पुराण, रामायण, महाभारत, भगवद्गीता आणि पूर्वजांकडून मिळालं आहे, त्याचाच वापर करून मी ते पुढे आणलं. मी जर याचं पेटंट करून घेतलं असतं तर इलॉन मस्कपेक्षाही जास्त श्रीमंत झालो असतो."
आपल्या जुन्या एका विधानाबद्दल बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, मी एकदा बोललो होतो की स्वामी रामदेव यांचा वेळ टाटा, बिर्ला, अदानी, झुकरबर्ग, इलॉन मस्क, वॉरन बफेट, बिल गेट्स यांच्याही पेक्षा महत्त्वाचा आहे. ते स्वतःसाठी जगतात, पण संन्यासी इतर सगळ्यांसाठी जगत असतो. त्यामुळे त्याचा वेळ, शक्ती आणि ज्ञान सगळ्यांच्या कल्याणासाठी असतं.
इलॉन मस्कबद्दल बोलताना बाबा रामदेव म्हणाले, "तो म्हणतो, मी अशी गाडी बनवेन, आकाशात तुमच्यासाठी जागा मिळवून देईन. तो टेक्नोलॉजीबद्दल बोलतो, पण जे आमच्याकडे वेद, पुराण, धार्मिक पुस्तकं आणि पूर्वजांचं ज्ञान आहे, त्यामध्ये संशोधन केलं, त्याची जर नोंद केली असती तर इलॉन मस्कपेक्षा जास्त श्रीमंत स्वामी रामदेव असता. पण ते ज्ञान आम्ही विश्व कल्याणासाठी दिलं आहे."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.