देश

Hindenburg Report: ''राहुल गांधी फॉरेन एजंट, शेअर मार्केटला अस्थिर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न''

Rahul Gandhi Hindenburg Report BJP Attack: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या रिपोर्टवरून भाजपवर गंभीर आरोप केले होते. आता याला भाजपकडून उत्तर देण्यात आले आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- हिंडनबर्गच्या रिपोर्टने भारतात खळबळ उडाली आहे. हिंडनबर्गच्या रिपोर्टवरुन सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या रिपोर्टवरून भाजपवर गंभीर आरोप केले होते. आता याला भाजपकडून उत्तर देण्यात आले आहे. राहुल गांधी हे फॉरेन एजंट असून हिंडनबर्ग रिपोर्टमागे काँग्रेसचा हात असल्याचा उलट दावा केला आहे.

भाजपचे नेते रवी शंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर काँग्रेसला घेरले. हिंडनबर्गचा रिपोर्ट शनिवारी प्रसिद्ध झाला होता. विरोधकांनी रविवारी या मुद्द्यावरून रान पेटवलं, भारतीय शेअर मार्केटला धक्के बसावेत यासाठी काँग्रेसकडून हे करण्यात आलं, असा दावा रवी शंकर प्रसाद यांनी केला आहे. एएनआयने यासंदर्भातील रिपोर्ट दिला आहे.

जॉर्ज सोरोस कोण?

जॉर्ज सोरोस हा देशांमध्ये सत्ता बदल घडवून आणण्यासाठी ओळखला जातो. तोच हिंडनबर्गचा गुंतवणूकदार आहे. मला काँग्रेसला विचारायचं आहे त्यांना काय हवं आहे? सोरोस यांनीच लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीसाठी धोकादायक आहेत म्हटलं होतं. जॉर्ज सोरोस हा कायम भारतविरोधी प्रोपेगेंडा राबवत आहे. तोच हिंडनबर्गमधील प्रमुख गुंतवणूकदार आहे, असं रवी शंकर म्हणाले आहेत.

नरेंद्र मोदींचा द्वेष करणाऱ्या काँग्रेसमध्ये आता देशाबद्दल द्वेष निर्माण झाला आहे. भारताच्या शेअर मार्केटला धक्का लागला म्हणजे याचा गुंतवणुकदारांवर परिणाम होणार नाही का? ते आता याबाबत जेपीसी चौकशीची मागणी करत आहेत. त्यांना भारतीय शेअर मार्केट कोसळावा असं वाटत आहे. छोटे गुंतवणूकदार कंगाल व्हावे असंच त्यांना वाटत आहे, असा आरोप रवी शंकर यांनी केला.

आरोप फेटाळले

हिंडनबर्गने सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बूच यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माधवी पुरी बूच आणि त्यांचे पती यांची अदानी ग्रुपमध्ये गुंतवणूक आहे. त्यामुळेच त्या अदानी ग्रुपची चौकशी करत नाहीयेत. अदानी ग्रुप, सेबी आणि बूच यांनी हिंडनबर्गच्या रिपोर्टवर स्वतंत्र प्रतिक्रिया दिली आहे. या सर्वांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र, या प्रकरणावरून भारतीय राजकारण तापलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT