son joins fathers cabinet in tamil nadu udhayanidhi stalin sworn in as minister for sports politics sakal
देश

Hindi Diwas: 'सनातन'नंतर आता 'हिंदी'बाबत उदयनिधी स्टॅलिन यांचं विधान चर्चेत; अमित शहांच्या भाषणावर दिली प्रतिक्रिया

आज हिंदी दिवस साजरा होत असून 'हिंदी भाषा देशाला एकत्र आणेल' असं विधान अमित शहांनी एका कार्यक्रमात केलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : सनातन धर्माबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर आता हिंदी भाषेबाबत तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. आज हिंदी दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'हिंदी भाषा देशाला एकत्र आणेल' असं विधान केलं होतं, त्यावर उदयनिधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Hindi Diwas Udayanidhi Stalin spoke on Hindi language to give reaction on Amit Shah speech)

अमित शहा काय म्हणाले?

हिंदी दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात अमित शाह म्हणाले की, "भारतातील भाषांच्या विविधतेला हिंदी एकत्र करते. तसेच या भाषेनं विविध भारतीय, जागतिक भाषा आणि बोलींचा सन्मान केला आहे. हिंदीनं कधीही इतर कोणत्याही भारतीय भाषेशी स्पर्धा केली नाही किंवा स्पर्धा करणार नाही. उलट सर्व भाषांना बळकट करूनच एक मजबूत देश उदयास येईल" (Latest Marathi News)

अमित शहांना प्रत्युत्तर

अमित शहांच्या या विधानावर उदयनिधी स्टॅलिन यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. हिंदी भाषा देशातील विविध भाषांना एकत्र आणेल, प्रांतीक भाषांना ती सक्षम करेल असं विधान नेहमीप्रमाणं अमित शहा यांनी केलं. हिंदी भाषेवर स्तुती सुमनं उधळण्याचं काम त्यांनी केलं आहे. (Marathi Tajya Batmya)

हे वेगळ्या पद्धतीनं सांगणं आहे की तुम्ही हिंदी भाषेचा अभ्यास केल्यास तुमची प्रगती होईल. तामिळनाडून तमिळ भाषा, केरळमध्ये मल्याळम भाषा आहेत. या दोन राज्यांना हिंदी भाषेनं कुठे एकत्र केलंय. यामुळं कुठलं सक्षमीकरणं झालंय? असा सवालही त्यांनी केला.

इतर भाषांना बदनाम करणं थांबवा

पुढे बोलताना उदयनिधी म्हणाले, हिंदी भाषा ही केवळ चार ते पाच राज्यांतच बोलली जाते, तर ती संपूर्ण देशाला कधी एकत्र आणू शकते. अमित शाहांनी हिंदी व्यतिरिक्त इतर भाषांना प्रादेशिक भाषा म्हणून बदनाम करणं थांबवावं," असं त्यांनी #StopHindiImposition असा हॅशटॅग वापरत आपल्या पोस्टचा शेवट केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT