Ambedkar1 
देश

Mahaparinirvan Din: महापरिनिर्वाण दिनानिमित्त लावलेल्या पोस्टर्सवर बाबासाहेब भगव्या कपड्यांत!

या पोस्टरवरुन आता वाद निर्माण झाला असून ज्यांनी हे केलंय त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

चेन्नई : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरात बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात येत आहे. यानिमित्त विविध संघटनांकडून पोस्टर्सही लावण्यात आले आहेत. अशाच एका पोस्टरमुळं मात्र वाद निर्माण झाला आहे. तामिळनाडूत एका भित्तीपत्रकात लावण्यात आलेल्या पोस्टरवर डॉ. आंबेडकरांच्या फोटोमुळं हा वाद निर्माण झाला आहे.

भगव्या कपड्यातील आणि कपाळी विभूतीच्या तीन रेषा लावलेला फोटो वापरण्यात आला आहे. यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. हिंदू मुन्ननी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हे पोस्टर चिकटवलं आहे. यामध्ये आंबेडकरांना हिंदुत्ववादी नेते म्हणून दाखवण्यात आलं आहे. या प्रकाराचा विदुथराई चिरुथैगल काची नामक पक्षानं या घटनेचा निषेध केला आहे. या पोस्टरमध्ये बाबासाहेबांच्या या फोटोसह तमिळ भाषेत काही वाक्ये लिहिण्यात आली आहेत. यामध्ये चहा हिंदु (महाकाव्य) नेत्याचा गौरव करुयात.

संघटनांनी वर्तवला निषेध

हे पोस्टर सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे. यामध्ये व्हीसीके पक्षाचे नेते थोल थिरुमावलवन यांनी म्हटलं की, "सनातनी शक्ती, वर्णभेद आणि मनुस्मृतीच्या वर्चस्वाच्या विरोधात शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या आणि १० लाख लोकांसह हिंदू धर्म सोडून धर्मांधांना आव्हान देणाऱ्या आंबेडकरांना बदनाम करणाऱ्या धर्मांधांचा मी निषेध करतो"

हे ही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

शिव, विष्णू आणि ब्रह्मा यांसारख्या देवतांची पूजा न करण्याची शपथ घेणार्‍या क्रांतिकारक आंबेडकरांच्या कपाळावर विभूती लावलेल्या आणि भगव्या पोशाखातल्या व्यक्तीचं चित्रण करून धर्मांधांनी त्यांचा अपमान केला. त्यामुळे व्हीसीके तामिळनाडू सरकारकडे त्यांना अटक करण्याची मागणी करत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मानखुर्द विधानसभेत नवाब मलिक पिछाडीवर, अबू आझमी आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT