India gate Sakal
देश

इतिहासाचे साक्षीदार : ‘इंडिया गेट’

इंडिया गेटची निर्मिती इंग्रजांनी केली होती.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध इंडिया गेटवर गेल्या ५० वर्षांपासून धगधगत असलेल्या अमर जवान ज्योती स्मारकातील ज्वाला राष्ट्रीय युद्ध स्मारकामधील ज्वालेत शुक्रवारी विलीन झाली. यावरुन काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी केंद्र सरकावर टीका केली आहे. अशा या ज्योतीचे व इंडिया गेटचे महत्त्व काय आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

इंडिया गेटचे १९३१मध्ये उद्‍घाटन

इंडिया गेटची निर्मिती इंग्रजांनी केली होती. १९१४ ते १९२१ याकाळात झालेले पहिले महायुद्ध व तिसऱ्या आंग्लो-अफगाणिस्तान युद्धात ज्या ब्रिटिश भारतीय सेनेच्या सैनिकांना जीव गमवावा लागला त्यांच्या स्मरणार्थ ब्रिटिश सरकारने हे स्मारक उभारले होते. या युद्धांमध्ये भारताचे ८० हजारपेक्षा जास्त सैनिक हुतात्मा झाले होते.

विसाव्या शतकातील महान ब्रिटिश वास्तुरचनाकार एडविन ल्युटन्स यांनी इंडिया गेटचे आरेखन केले होते. त्याची पायाभरणी १० फेब्रुवारी १९२१ रोजी झाली होती. दहा वर्षांनी त्याचे बांधकाम पूर्ण होऊन १२ फेब्रुवारी १९३१ रोजी तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी इंडिया गेटचे उद्‍घाटन केले होते.

अमर जवान ज्योती

डिसेंबर १९७१मध्ये भारत व पाकिस्तान युद्ध झाले होते. ३ ते १६ डिसेंबरपर्यंत चाललेल्या या युद्धात पाकिस्तानला शरणागती पत्‍करावी लागली होती. पण या युद्धात भारताचेही अनेक जवानांना वीरमरण प्राप्त झाले. त्या जवानांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योती प्रज्वलित करण्याचा निर्णय झाला होता. यानंतर इंडिया गेटच्या खाली काळ्या संगमरवरातील स्मारक तयार करण्यात आले व त्यावर ‘अमर जवान ज्योती’ असे शब्द कोरण्यात आले आहेत. स्मारकावर ‘एल१ए१’ ही स्वयंचलित रायफल ठेवलेली आहे. या रायफलवर जवानांचे हेल्मेटही ठेवलेले आहे. या स्मारकाचे उद्‍घाटन २६ जानेवारी १९७२ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले. या स्मारकातील ही ज्योती गेल्या ५० वर्षांपासून तेवत आहे. एका अहवालानुसार ही ज्योत प्रज्वलित ठेवण्यासाठी २००६ पर्यंत ‘एलपीजी’चा वापर होत होता. नंतर ‘सीएनजी’चा वापर होऊ लागला.

राष्ट्रीय युद्ध स्मारक

इंडिया गेटजवळ ४० एकर क्षेत्रावर राष्ट्रीय युद्ध स्मारक तयार केले आहे. स्वांतत्र्यानंतर भारताच्या इतिहासात झालेली वेगवेगळी युद्धे आणि विविध घटनांमध्ये हुतात्मा झालेल्या २६ हजार जवानांची नावे या स्मारकावर लिहिली आहेत. त्याचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी २०१९मध्ये केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Of Maharashtra : महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची गुगली, राज्यात राजस्थान MP पॅटर्नचे सुतोवाच

Latest Maharashtra News Updates : निफाडचे उमेदवार दिलीप बनकर यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांची पिंपळगाव बसवंत मध्ये सभा

Beed Assembly Election 2024 : ‘कटेंगे, बटेंगे’ असे चालणार नाही अजित पवार

21 Fours, 8 Sixes: RCB ने ज्याला दाखवला 'ठेंगा', त्यानेच दाखवला 'इंगा'; दोनशेपार धावांवर अजूनही खेळतोय, गोलंदाजांना बदडतोय

Champions Trophy 2025: 'काहीही झालं तरी स्पर्धा दुसरीकडे हलवू देऊ नका' पाकिस्तान सरकारचे बोर्डाला आदेश

SCROLL FOR NEXT