नवी दिल्ली : अयोध्येत राममंदिराची प्रतीक्षा ही अनेक शतकांची होती. काल ती पुर्ण झाली आहे. काल(सोमवारी) रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा ऐतिहासीक सोहळा पार पडला आहे. जाणून घ्या पंधराव्या दशकापासूनचा संपुर्ण इतिहास...
१५२८ : मुघल सम्राट बाबरचा सेनापती मीर बाकी याने राममंदिर पाडून बाबरी मशीद बांधली
१८८५ : महंत रघुवीर दास यांनी फैजाबाद जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करून वादग्रस्त इमारतीच्या बाहेर छत बांधण्याची परवानगी मागितली आहे.न्यायालयाने याचिका फेटाळली
१९४९ : वादग्रस्त भागाच्या बाहेर मध्यवर्ती घुमटाखाली रामलल्लाच्या मूर्ती ठेवल्या
१ फेब्रुवारी १९८६ : स्थानिक न्यायालयाने सरकारला हिंदू भाविकांसाठी जागा खुली करण्याचा आदेश
१४ ऑगस्ट १९८९ : अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त भागासंदर्भात ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिला
६ डिसेंबर १९९२ : राम जन्मभूमीच्या जागेवर १६ व्या शतकात बाबरी मशीद बांधली गेली, असा दावा करीत हिंदू करसेवकांनी ती पाडली
३ एप्रिल १९९३ : वादग्रस्त भागात केंद्राकडून जमीन संपादित करण्यासाठी ‘काही क्षेत्राचे अधिग्रहण कायदा’ मंजूर
एप्रिल २००२ : अलाहाबाद उच्च न्यायालयात वादग्रस्त जागेची मालकी कोणाची आहे हे ठरवण्यासाठी सुनावणी सुरू झाली
३० सप्टेंबर २०१० : उच्च न्यायालयाने दोन विरुद्ध एक अशा मतांनी वादग्रस्त जमिनीचे सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला या तिघांमध्ये वाटप केले
९ मे २०११ : अयोध्येतील जमीन वादावर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली
जानेवारी २०१९ : सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाची स्थापना केली
६ ऑगस्ट २०१९ : सर्वोच्च न्यायालयाने जमिनीच्या वादावर दैनंदिन सुनावणी सुरू
१६ ऑक्टोबर २०१९ : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी समाप्त. निर्णय राखून ठेवला
९ नोव्हेंबर २०१९ : अयोध्येतील पूर्ण २.७७ एकर वादग्रस्त जमीन रामलल्लाला मंजूर करण्याचा व ताबा केंद्र सरकारकडे राहील, असा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल. मुस्लिमांना मशीद बांधण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी पाच एकर जमीन देण्याचेही सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला निर्देश
५ फेब्रुवारी २०२० : अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत घोषणा
५ ऑगस्ट २०२० : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राम मंदिराची पायाभरणी
२२ जानेवारी २०२४ : अयोध्येतील मंदिरात राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.