Helicopter Facility At Temple: दरवर्षी लाखो लोक श्रद्धेने देवस्थानात जातात. प्रसिद्ध आणि पवित्र अशा तीर्थस्थळांना जाऊन एकदा तरी दर्शन घ्यायंचं अनेक भक्तांचं स्वप्न असतं. मात्र तीर्थस्थळी जाणं वाटतं तेवढं साधं सोपही नाहीये. पर्वतरांगांमधल्या रस्त्यांवरून हा प्रवास करावा लागतो. ज्यांना ते सहज शक्य नाही अशांसाठी हवाईमार्ग सोपा पडतो. मात्र अनेकांना केदारनाथ सोडून अन्य काही तीर्थक्षेत्रांवरही हेलीकॉप्टरची सुविधा असल्याची कल्पना नाहीये. चला तर आज आपण त्याबाबत जाणून घेऊया.
१) वैष्णो देवी
जम्मू आणि काश्मीरमध्ये असलेलं वैष्णो देवी धान भारतातील लोकप्रिय देवस्थानांपैकी एक आहे. हे देवस्थान 52OO फूट उंचावर आहे. एवढ्या उंचावर असल्याने येथे जाणेही कठीणच ठरते. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला 12 किमी पर्यंत ट्रेकिंग करावी लागते. मात्र आता तुम्ही ट्रेकिंग वगळून हेलीकॉप्टर सेवेचाही आनंद घेऊ शकता. तुमचा वेळही त्यामुळे वाचेल.
२) गंगोत्री
गंगोत्री भारतातल्या चार महत्वपूर्ण धामांपैकी एक आहे. या ठिकाणी यात्रेला जाणंही सोपं नाही. मात्र आता हेलीकॉप्टर सुविधेमुळे हा प्रवास तुमच्यासाठी सोपा ठरू शकतो. हा प्रवास देहराडूनमध्ये सहस्त्रधारा हेलीपॅडपासून सुरू होतो तर नंतर हरसिलला येऊन थांबतो.
३) केदारनाथ
केदारनाथ मंदिर देशातल्या मुख्य तीर्थस्थानांपैकी एक आहे. येथील यात्रा काही साधारण नाही. मात्र आता तुम्ही गंगोत्रा धामसाठी हेलीकॉप्टर सर्विस घेऊ शकता. येथे तुम्हाला प्रायव्हेट आणि सरकारी दोन्ही प्रकारच्या हेलीकॉप्टर सर्विसेस मिळतील.
४) अमरनाथ
अमरनाथ यात्रा धार्मिक स्थळांतील एक महत्वपूर्ण यात्रा मानली जाते. ही यात्रा तुम्हाला बर्फाने आच्छादलेल्या पर्वतरांगामधून करावी लागते. मानलं जात अमरनाथमध्ये शिवजींनी पार्वती मातेला जीवन आणि अनंत काळाचं रहस्य समजावलं होतं. येथे अमरनाथ श्राइन बोर्डने भक्तांसाठी हेलीकॉप्टर सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.