एप्रिल महिन्यात कोरोना संक्रमित झाल्यानंतर काँग्रेस नेता शशी थरुर यांची प्रकृती अजूनही ठीक झालेली नाही. थरुर यांनी बुधवारी हॉस्पिटलमधून एक व्हिडिओ शेअर केला आहे.
नवी दिल्ली- एप्रिल महिन्यात कोरोना संक्रमित झाल्यानंतर काँग्रेस नेता शशी थरुर यांची प्रकृती अजूनही ठीक झालेली नाही. थरुर यांनी बुधवारी हॉस्पिटलमधून एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी म्हटलंय की, ते सध्या लाँग कोविडचा त्रास सहन करत आहेत. त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केंद्र सरकारला लस पॉलिसीसंदर्भात सल्ला दिला आहे. थरुर म्हणाले की, भारताला कोरोना संकटातून वाचवायचं असेल तर सर्वांना मोफत लस द्यावी लागेल. (hospital bed congress leaders shashi tharoor vaccination drive)
केरळच्या तिरुवनंतपुरमचे काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये म्हटलंय की, 'जसं की तुम्हाला दिसतंय, मी लाँग कोविड इन्फेक्शनमधून जात आहे. सरकार म्हणतंय की, डिसेंबर महिन्यापर्यंत सर्वांना लस दिली जाईल. लशीचा तुटवडा असताना असा दावा करण्यात आला आहे. मला प्रश्व पडतोय की सरकार हे लक्ष्य कशाप्रकारे पूर्ण करेल.'
काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भारताची लसीकरण मोहीम योग्य दिशेने जात असल्याचं म्हटलं होतं. तसेच येत्या डिसेंबरपर्यंत देशातील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येईल, असं म्हटलं होतं. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेद्वारे केंद्रावर टीका केली होती. लसीकरणाची गती मंद असल्याचं ते म्हणाले होते. यावर प्रत्युत्तर म्हणून प्रकाश जावडेकर यांनी लसीकरण मोहीम योग्यपणे सुरु असून डिसेंबरपर्यंत सर्व नागरिकांना लस मिळेल, असं म्हटलं होतं.
भारतात सध्या तीन लशींच्या वापराला मंजुरी आहे. यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि रशियाच्या स्पुटनिक V लशींचा समावेश आहे. सध्या सीरम इन्स्टिट्यूट महिन्याला 5 ते 6 कोटी लशींचे उत्पादन करते, तर भारत बायोटेकने मे महिन्यात 1.3 कोटी लशींचे उत्पादन केले आहे. रशियाच्या स्पुटनिल लशींचे उत्पादन भारतात नुकतेच सुरु करण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत देशात मुबलक प्रमाणत लस असतील असं सांगण्यात येत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.