PM Modi Esakal
देश

PM Modi: 'मोदी का जादू चल गया', जिंकलेल्या राज्यात PM मोदींनी कसा केला होता निवडणुकीचा प्लॅन?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मिझोराम वगळता अन्य चार राज्यांत झंझावती दौरा करत सभांची राळ उडवून दिली. तर काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी जोरदार प्रचार केला होता

सकाळ वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मिझोराम वगळता अन्य चार राज्यांत झंझावती दौरा करत सभांची राळ उडवून दिली. तर काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी जोरदार प्रचार केला होता. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये अक्षरश: मोदी यांची जादू चालली तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी जोर लावूनही पक्षाच्या पदरी निराशा पडली आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी चार राज्यांत १०८ रॅली आणि प्रचार सभा घेतल्या आहेत. (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झंझावात

मध्य प्रदेश

राज्यात रतलाम, सिवनी, खांडवा, सीधी, दमोह, गुणा, मुरैना, सतना, छत्रपूर, नीमच, बड़वानी, बेतुल, शाजापुर आणि झाबुआ येथे पंतप्रधान मोदी यांनी सभा घेतल्या. भाजपने मालवांचल व आदिवासी क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित केले होते. ‘मध्य प्रदेशाच्या मनात मोदी’ अशा घोषणेसह मोदींनी प्रत्येकी नऊ मतदारसंघामागे एक सभा घेतली आहे. पंतप्रधानांनी आदिवासींची मतपेढी साधण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. प्रचार थांबण्याच्या एक दिवस अगोदर मोदी यांनी इंदूर येथे रोड शो केला. (Marathi Tajya Batmya)

सभा : १४ रोड शो : १

छत्तीसगड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये चार सभा घेतल्या. त्यांनी राज्यातील प्रत्येक विभागात सभा घेतल्या. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या माध्यमातून स्थानिक मुद्द्यांना हात घातला होता. छत्तीसगडमधील सर्व उमेदवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर घेऊन मैदानात उतरले होते. पंतप्रधान मोदी यांनी कांकेर येथील सभेने छत्तीसगडच्या सभेचा प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर दुर्ग, विश्रामपूर, मुंगेर, महासुमंद येथे सभा घेतल्या.(Latest Marathi News)

सभा : ४ रोड शो : ०

राजस्थान

काँग्रेसशासित राजस्थानात पंतप्रधान मोदी यांनी प्रचारात कोणतीही कसर ठेवली नाही. या राज्यात त्यांनी १२ सभा घेतल्या. उदयपूर येथून पंतप्रधान मोदी यांनी प्रचार सुरू केला. त्यानंतर चितोडगड, भरतपूर, जयपूरसह एकूण १२ सभा घेतल्या. ‘मोदी साथे आपनो राजस्थान’ अशा घोषणांना केंद्रस्थानी ठेवून भाजपने नियोजनबद्ध प्रचार केला होता. त्याचे सकारात्मक परिणाम दिसले. (Marathi Tajya Batmya)

सभा : १२ रोड शो : २

तेलंगणा

तेलंगणात कामारेड्डी आणि रंगारेड्डीसह हैदराबादच्या दुर्बका निर्मल येथे पंतप्रधानांनी सभा घेतल्या. विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी तिरुमला येथे बालाजीचे दर्शन घेतले. यादरम्यान त्यांनी महबुबाबाद व करीमनगर येथेही सभा घेतल्या. हैदराबाद येथील त्यांचा रोड शो लक्षवेधी ठरला. त्यामुळे भाजपच्या जागा वाढण्यास हातभार लागला. एकवरून भाजपला आठ आमदारांपर्यंत धडक मारण्यात यश मिळाले.

सभा : ८ रोड शो : १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT