नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीशी निगडीत काही लोकांवर छापेमारी करण्यात आल्याचं प्रकरण तापलेलं आहे. यावर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलंय की, एखाद्या सामान्य माणसाच्या घरी एवढी मोठी रक्कम प्राप्त होऊ शकत नाही. अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या या वक्तव्यांमुळे हे स्पष्ट होतं की, माजी मुख्यमंत्री या छापेमारीमुळे हादरले आहेत.
उरली गोष्ट आयटी रेडची... तर अत्तर व्यावसायिक आणि एसपी एमएलसी पुष्पराज जैन आणि इतरांवरील संपत्तीवर आजचे आयकर छापे हे कारवाई योग्य गुप्त माहितीच्या आधारावरच केले गेले आहेत. आजच्या आयटी छाप्यांमध्ये असंबंद्ध सामग्री समोर आली आहे.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पुढे म्हटलंय की, लॉ इन्फोर्सिंग एजन्सी एखाद्या ठिकाणी छापा मारते तेंव्हा तो छापा माहितीच्या आधारेच मारते. कानपुरमध्ये अत्तर व्यावसायिकाच्या घरावरील छापा हा जीएसटीच्या माहितीच्या आधारेच मारण्यात आला होता. यावरुन गेल्या दोन दिवसांमध्ये खूपच चुकीची माहिती पसरवली गेली आहे. यातील सत्यता समोर आणण्यासाठी एक प्रेस नोट जाहीर केली आहे.
त्यांनी पुढे विचारलं की, जे लोक यावर टीका करत आहेत, त्यांना मी एक गोष्ट विचारु इच्छिते की, जी टीम गेली होती ती रिकाम्या हाताने परतली का? जर चुकीच्या व्यक्तीच्या घरी ते गेले असते तर त्यांना एवढे पैसे सापडले असते का? समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव या कारवाईने हादरलेत का? त्यांना भीती वाटतेय का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.