How Exit Poll Determined e sakal
देश

निकालाआधी येणारे Exit Poll कसे काढतात? वाचा निवडणूक आयोगाच्या गाइडलाइन्स

सकाळ डिजिटल टीम

How Exit Poll Determined Before Election Result : नवी दिल्ली : देशात उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या पाच राज्यांत मतदान (Five States Assembly Election) पार पडले. आज उत्तर प्रदेशातील पूर्वांचलमध्ये ५४ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर 6 वाजल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल येतील. पण, निवडणुकीचा प्रत्यक्ष निकाल लागण्यापूर्वी एक्झिट पोल (Exit Poll) कसे काढले जातात? नेमकी प्रक्रिया काय असते? हेच आपण जाणून घेणार आहोत.

कसे काढतात एक्झिट पोल? -

एक्झिट पोलसाठी मतदारांचं सर्वेक्षण करण्यात येते. मतदानाच्या दिवशी हा सर्व्हे केला जातो. यावेळी मतदारांनी कोणाला मत दिले यासह अनेक प्रश्न विचारले जातात. सर्व्हे करणाऱ्या यंत्रणाच्या टीम मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांना गाठून हे प्रश्न विचारतात. त्यानंतर त्याचं विश्लेषण करून निकालाचा अंदाज लावण्यात येतो. पण, हे एक्झिट पोल कधी कधी चुकीचे देखील ठरतात.

निवडणूक सर्वेक्षणाचे तीन प्रकार -

प्री पोल : निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्यानंतर आणि मतदान सुरू होण्यापूर्वी हे सर्वेक्षण केलं जातं. या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा ९ जानेवारीला घोषित झाल्या आणि मतदानाचा पहिला टप्प्या १० फेब्रुवारीपासून सुरू झाला. तर या निवडणुकांसाठी प्री पोल प्रकारात ९ जानेवारी ते १० फेब्रुवारीच्या दरम्यान सर्वेक्षण करण्यात आलं असावं.

एक्झिट पोल - हे सर्वेक्षण मतदानाच्या दिवशी करण्यात येतं. या प्रकारात मतदारांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. उत्तर प्रदेशात सात टप्प्यात मतदान पार पडले. त्यानुसार सात वेळा सर्वेक्षण करण्यात आले असावे.

पोस्ट पोल : मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाला पोस्ट पोल सर्व्हे म्हणतात. आज मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उद्यापासून या सर्वेक्षणाला सुरुवात होईल आणि दोन दिवसात निकाल सांगितले जातील.

एक्झिट पोलसाठी काय असतात गाईडलाइन्स? (Election Commission Exit Polls Guidelines)

  • एक्झिट पोलसंदर्भात भारतात पहिल्यांदा १९९८ मध्ये गाईडलाइन्स जारी करण्यात आल्या होत्या. निवडणूक आयोगाने आर्टीकल ३२४ अंतर्गत १४ फेब्रुवारी १९९८ च्या सायंकाळी ५ वाजेपासून ७ मार्च १९९८ च्या सांयकाळी ५ वाजेपर्यंत एक्झिट पोल घोषित करण्यावर बंदी घातली होती. कारण, १९९८ मध्ये निवडणुकीचा पहिला टप्पा १६ फेब्रुवारी आणि शेवटचा टप्पा ७ मार्चला पार पडला होता.

  • निवडणूक आयोग प्रत्येक निवडणुकीवेळी एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलसाठी गाईडलाइन्स जारी करतेय. रिप्रेजेंटेशन ऑफ पीपल्स अॅक्ट १९५१ नुसार, संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडत नाही तोपर्यंत एक्झिट पोल घोषित करण्यावर बंदी असते.

  • यंदा पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा घोषित करताना निवडणूक आयोगाने एक्झिट पोल गाईडलाइन्स जारी केल्या होत्या. १० फेब्रवारी सकाळी ७ वाजतापासून ७ मार्च सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत एक्झिट पोल दाखवण्यावर बंदी घातली आहे.

  • कोणी निवडणूक प्रक्रियेदरम्यान एक्झिट पोल किंवा कुठलंही सर्वेक्षण दाखवत असेल तर निवडणूक आयोगाच्या गाइडलाइन्सचे उल्लंघन मानले जाते. त्यानुसार संबंधित संस्था किंवा व्यक्तीला २ वर्षांचा शिक्षा किंवा दंड आकारला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, विमानतळावरच अडकून पडले!

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

SCROLL FOR NEXT