Aditya L1 Vs Parker eSakal
देश

Aditya L1 Vs Parker : इस्रोचं 'आदित्य एल १' आणि नासाचं 'पार्कर सोलर प्रोब' यांच्यात फरक काय?

भारताची आदित्य एल १ ही सूर्याच्या अभ्यासासाठीची पहिलीच अंतराळ मोहीम ठरणार आहे.

वैष्णवी कारंजकर

चांद्रयान ३ च्या दैदिप्यमान यशानंतर आता भारत पुन्हा एकदा इतिहास घडवण्यासाठी सज्ज आहे. भारताची आदित्य एल १ ही सूर्याच्या अभ्यासासाठीची पहिलीच अंतराळ मोहीम ठरणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात, इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, PSLVच्या माध्यमातून ही मोहीम आज लाँच करण्यात आली.

PSLV C-57 च्या साहाय्याने आदित्य एल १ कक्षेमध्ये सोडण्यात आलं आहे. L1 लॅग्रेंज पॉईंटजवळ हे यान स्थिरावेल. हा पॉईंट पृथ्वीपासून साधारण दीड मिलियन किलोमीटर अंतरावर आहे. सूर्य आणि त्याच्या आसपासच्या वातावरणाचा अभ्यास करणे यामुळे शक्य होणार आहे. या अभ्यासादरम्यान ग्रहणाचाही अडथळा येऊ शकणार नाही. हे यान साधारणपणे चार महिन्यांमध्ये आपल्या नियोजित स्थळी पोहोचेल, असा अंदाज बांधण्यात येत आहे.

नासाने आपलं पार्कर हे यान २०१८ साली लाँच केलं होतं. हे यान 'सूर्याला स्पर्श' करण्यासाठी बनवण्यात आल्याचा दावा नासाने केला होता. हे या सूर्याच्या आत्तापर्यंतच्या सर्वात जवळच्या कक्षेत जाणार होतं, यामुळे ही मोहीम अभूतपूर्व ठरेल. सूर्याच्या परिसरातलं उच्च तापमान, सौर वादळे, उर्जाकण या सगळ्याचा सामना हे यान करेल. या यानामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान तसंच कार्बन कम्पोझिट शिल्ड वापरण्यात आलं आहे. यामुळे सौर वातावरणाचा, अंतराळातल्या हवामानाचा आणि सूर्याच्या पृथ्वीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करता येऊ शकतो.

आदित्य L1 च्या उलट, नासाचे पार्कर यान सूर्याच्या सीअरिंग पृष्ठभागाच्या ३.९ दशलक्ष मैलांच्या आत असेल, NASA च्या दाव्यानुसार हे आधीच कोरोनामध्ये आहे जे सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा जास्त गरम मानले जाते. यामुळे या यानाला सूर्याच्या वरच्या वातावरणातील डेटा गोळा करता येईल.

आदित्य एल १ या यानावर सात विशेष उपकरणे असतील, ज्यामुळे सूर्याचा सखोल अभ्यास करता येईल.

  • VELC - व्हिसिबल एमिशन लाईन कोरोनाग्राफ

  • SUIT - सोलर अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप

  • SoLEXS - सोलर लो एनर्जी एक्स रे स्पेक्ट्रोमीटर

  • HEL1OS - हाय एनर्जी एल १ ऑर्बिटिंग एक्स रे स्पेक्ट्रोमीटर

  • ASPEX - आदित्य सोलर विंग पार्टिकल एक्सपेरिमेंट

  • PAPA - प्लाझ्मा अॅनलायझर पॅकेज फॉर आदित्य

  • अॅडव्हान्स ट्राय अॅक्सिअल हाय रिझोल्यूशन डिजिटल मॅग्नेटोमीटर्स

दुसरीकडे, पार्कर यानामध्ये खालील उपकरणे असतील -

  • FIELDS - फील्ड एक्सपेरिमेंट

  • ISIS - इंटिग्रेटेड सायन्स इन्व्हेस्टिगेशन ऑफ द सन

  • WISPR - वाइड-फील्ड इमेजर फॉर सोलर प्रोब

  • SWEAP - सोलर विंड इलेक्ट्रॉन्स अल्फास अँड प्रोटॉन्स

नासाची पार्कर आणि इस्रोची आदित्य एल १ या दोन्ही अंतराळ मोहिमांचं लक्ष्य सारखंच आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचा, तिथल्या वातावरणाचा अभ्यास करणं आणि त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम अभ्यासणं. अर्थात या मोहिमा यशस्वी झाल्या तर हा अभ्यास करणं शक्य होणार आहे.

सूर्याबद्दलचं गूढ उलगडण्यासाठी अनेक अंतराळ संशोधन संस्थांनी सूर्यावरच्या मोहिमा आखल्या आहे. २०१८ मध्ये नासाने आपलं पार्कर हे यान सूर्यावर सोडलं. हे यान सूर्याच्या कोरोनामध्ये थेट जाण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. यानंतर नासा आणि इसा या संस्थांनी मिळून २०२० मध्ये सोलर ऑर्बिटर लाँच केलं. यामुळे अंतराळावर सूर्याचा पडणारा प्रभाव अभ्यासता येणार आहे.

सूर्यापासून २६ दशलक्ष किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या सोलर ऑर्बिटरमध्ये १० आधुनिक उपकरणे बसवली आहेत. सूर्याच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या प्रतिमा या ऑर्बिटरने घेतल्या. पार्कर यानाच्या मदतीने ही कामगिरी पार पडली. या दोन्ही मोहिमांमुळे सूर्याचं जगाने कधी न पाहिलेलं रुप पाहायला मिळालं, असं प्रतिपादन नासाने केलं होतं. जपान, चीन आणि रशियाही सूर्यावरच्या मोहिमांसाठी प्रयत्न करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Merger: बँकांचे होणार विलीनीकरण; 43 वरून 28 होणार संख्या, काय आहे सरकारचा प्लॅन?

Nashik News : ‘नाट्यचौफुला’ तून 8 तासांचा नाट्यानुभव; मराठी रंगभूमीच्या इतिहासातील यशस्वी उपक्रम

मी ते कधीही विसरू शकणार नाही... 'वास्तव'च्या सेटवर संजय दत्तने संजय नार्वेकरांना दिलेली अशी वागणूक; म्हणाले-

Prostate Cancer : प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे नेमकं काय? या गंभीर आजाराची कोणती आहेत लक्षणे? जाणून घ्या..

Jalna Assembly Election 2024 : जालना विधासनभा खोतकरांना रोखण्यासाठी भाजप मैदानात

SCROLL FOR NEXT