Jacqueline Fernandez  
देश

जॅकलिनच्या कथित बॉयफ्रेंडने जेलमधून घेतली २०० कोटींची खंडणी; असा होता मास्टरप्लॅन

एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावी असंच हे संपूर्ण प्रकरण आहे.

स्वाती वेमूल

अब्जाधीश पती तुरुंगात असताना त्याला जामिन मिळवण्यासाठी पत्नी तासनतास फोनवर कोणाशी तरी चर्चा करते. देशाच्या गृहसचिवांसह वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी आपण बोलतोय, असं तिला वाटत असतं. ती फोनवर गृहमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागते. तिने सहकार्य केल्यास योग्य वेळी भेट करून दिली जाईल, असं आश्वासन तिला दिलं जातं. यावेळी पार्टी फंडसाठी दिलेल्या पैशांचा उल्लेखही ती फोनवर करते. हा सगळा प्रकार आणि २०० कोटी रुपयांचं खंडणी प्रकरण उघड करण्यास काही महिने लागले. जुलैमध्ये अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) इशारा मिळाल्यानंतर तिने ते संभाषण रेकॉर्ड करण्यास सुरू केलं. संभाषणाचे सर्व टेप्स ईडीकडे सोपवण्यात आले आहेत आणि २०० कोटी रुपयांची खंडणी आणि फसवणूक केल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे.

कारागृहातून केले फोन-

एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावी असंच हे संपूर्ण प्रकरण आहे. यातील सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे तिला फोन करणारा व्यक्ती हा तिहार कारागृहातील होता. कारागृहात फोन आणि सॉफ्टवेअरचा वापर करत त्याने उच्च सरकारी अधिकाऱ्यांचे फोन नंबर मिळवले आणि त्याच नंबरने फोन करत असल्याचं भासवलं. ईडीने त्यांच्याकडे असलेले ८४ रेकॉर्डिंग्स दिल्ली न्यायालयासमोर सादर केले आहेत. २०१७ पासून कारागृहात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने (Sukesh Chandrashekhar) हा मास्टरप्लॅन केला आहे. सुकेशचे फोन रेकॉर्ड करणारी व्यक्ती ही शिविंदर सिंगची पत्नी अदिती सिंग आहे. शिविंदर हा त्याचा भाऊ मलविंदर सिंगसोबत रॅनबॅक्सी या फार्मा कंपनीचा सहमालक होता. २०१९ मध्ये त्याला मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

विशेष म्हणजे सुकेश चंद्रशेखरने तोतयागिरी केलेल्या कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली नाही. अदिती सिंगने सुकेश चंद्रशेखरविरोधात गुन्हा दाखल केला असून २०० कोटी रुपये देण्याची धमकी तिला दिल्याचा आरोप आहे. जून २०२० पासून अदितीने वरिष्ठ सरकारी अधिकारी समजून सुकेशशी बोलण्यास सुरुवात केली.

अदितीला फसवण्यासाठी सुकेशने वापरलेली अधिकाऱ्यांची नावं-

अजय भल्ला- गृह मंत्रालयातील सर्वोच्च अधिकारी

अनुप कुमार- देशाचे कायदा सचिव

अभिनव- कायदा मंत्रालयातील कनिष्ठ अधिकारी

सुकेश चंद्रशेखर आणि आदिती सिंग यांचे फोन त्यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या प्रकरणांसाठी टॅप करण्यात आले होते. जवळपास ११ महिने हे दोघं एकमेकांच्या संपर्कात होते. तपासकर्त्यांच्या माहितीनुसार, अदिती सिंगने नंतरचे काही फोन रेकॉर्ड केले होते. तिची बहीण अरुंधती खन्नादेखील रेकॉर्डिंगमध्ये सहभागी आहे.

विविध सरकारी अधिकारी असल्याचं भासवत सुकेश त्यांच्याकडून जामिनाच्या बदल्यात पैशांची मागणी करतो, असं त्या रेकॉर्डिंगमधून स्पष्ट होत आहे. तर अदितीची बहीण अरुंधती त्याविषयी त्याला म्हणते, "तू माझ्यावर इतका दबाव टाकलास, तर मी काहीच करू शकत नाही. याआधीही मी तुला पैसे दिले आहेत आणि त्यातून फक्त संकटंच निर्माण झाली आहेत. तू हा पैसा नेमका कशासाठी वापरतोय हेसुद्धा आम्हाला कळत नाहीये. मी तुला कधी विचारलं नाही आणि तू सुद्धा कधी सांगितलं नाहीस. कारण आम्ही ते पार्टी फंडसाठी देत आहोत. आम्ही देणगी म्हणून ही रक्कम देत आहोत. आता ती रक्कम तू कशासाठी वापरतोय ते तुलाच माहित."

गृहसचिव अजय भल्ला असल्याचं भासवत सुकेश या फोनमध्ये गृहमंत्री अमित शाह यांचाही उल्लेख करतो. "तुम्हाला कॉल करण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी वैयक्तिकरित्या सूचना दिल्या आहेत. तुमच्या पतीला जामिन मिळवण्यासाठी सरकारी अधिकारी तुमच्याशी संपर्क साधतील. पण हे सर्व तुम्ही सहकार्य केलं तरंच शक्य आहे", असं तो या कॉलवर म्हणतो.

अदिती सिंगने सुकेश चंद्रशेखरविरोधात तक्रार दाखल करताना तिच्याकडून ३० हप्त्यांमध्ये २०० कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. तक्रारीत तिने अनुप कुमार (कायदा सचिव) आणि अभिनव यांच्याकडून आलेल्या फोन कॉल्सचा उल्लेख केला. "त्या लोकांनी मला धमक्या दिल्या. त्यामुळे मी त्यांना माझे दागिने, गुंतवणूक आणि इतर माध्यमांतून २०० कोटी रुपये देत गेले. मात्र त्यानंतरही मला त्यांच्याकडून धमक्या येत होत्या", असं ती म्हणाली. तिची फसवणूक केली जात असल्याचं ईडीने सांगितल्यानंतर तिने तक्रार दाखल केली होती.

अदिती सिंगप्रमाणेच सुकेशने इतरही अनेकांना फसवलं आहे. चेन्नईमध्ये तो अत्यंत आलिशान जीवन जगत होता. समुद्रकिनारी मोठा बंगला, २३ महागड्या गाड्या, ज्यामध्ये फेरारी, बेंट्ले आणि रोल्स रॉयस यांचाही समावेश होता. यामध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचंही नाव समोर आलं आहे. तपासादरम्यान जॅकलिनने सुकेशकडून महागड्या भेटवस्तू मिळाल्याचं कबूल केलं आहे. मात्र त्याच्यासोबत कोणतेही अवैध आर्थिक व्यवहार केला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT