Republic Day Parade 2024 esakal
देश

Republic Day Parade 2024 : दिल्ली-कर्नाटकसह 2 राज्यांचे चित्ररथ संचलनातून रद्द; जाणून घ्या, चित्ररथांची निवड कशी केली जाते?

भारतात दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील राजपथावर पथसंचलन केले जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Republic Day Parade 2024 : भारतात दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील राजपथावर पथसंचलन केले जाते. या पथसंचलनात देशातील विविध राज्यांतील चित्ररथांचा सहभाग आढळून येतो.

परंतु, यंदाच्या प्रजासत्ताकदिनी दिल्ली, कर्नाटक, पंजाब आणि पश्चिम बंगालच्या चित्ररथांची झलक पहायला मिळणार नाही. या सर्वांचे चित्ररथ यंदा रद्द करण्यात आले आहेत. मात्र, हे पहिल्यांदाच घडले आहे, असे अजिबात नाही. यापूर्वी देखील प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनासाठी काही राज्यांचे चित्ररथ रद्द करण्यात आले होते. यामागे अनेक कारणे आहेत.

या संदर्भात पंजाब, कर्नाटक, दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील नेत्यांनी निवड समितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर संरक्षण मंत्रालयाने उत्तर देताना म्हटले आहे की, चित्ररथांसाठी जी खास थीम ठरवण्यात आली आहे. त्या थीमशी या राज्यांचे चित्ररथ जुळत नाहीत.

अशा परिस्थितीमध्ये प्रजासत्ताक दिनासाठी चित्ररथाची निवड कशी केली जाते? याची प्रक्रिया काय असते?  आणि यासाठी किती टप्पे पार करावे लागतात? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आज या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

चित्ररथांची निवड कोण करते ?

प्रजासत्ताक दिनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची जबाबदारी ही संरक्षण मंत्रालयाची असते. हे मंत्रालय केंद्रशासित प्रदेश, राज्य, मंत्रालये आणि घटनात्मक एककांकडून चित्ररथांसाठी अर्ज मागवते. ऑक्टोबरमध्ये संरक्षण मंत्रालयाने एक परिपत्रक जारी करून राज्यांकडून अर्ज मागवले होते. त्यासाठी, विविध राज्यांमधून आलेल्या अर्जांमध्ये त्यांच्या चित्ररथांची झलक कशी असेल? हे सांगण्यात आले होते.

आता या चित्ररथांची निवड कोण करते, त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. खरं तर यासाठी संरक्षण मंत्रालय एक निवड समिती स्थापन करते. या निवड समितीमध्ये चित्रकला, संगीत, संस्कृती, वास्तुकला, शिल्पकला आणि नृत्यदिग्दर्शन यांसह विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असतो.

ही समिती आलेल्या अर्जांची संकल्पना आणि डिझाईनची तपासणी करते. या टप्प्यामध्ये चित्ररथ कसा असेल? याच्या स्केचचा समावेश असतो. ज्यामध्ये, त्या चित्ररथाची वैशिष्ट्ये नमूद करण्यात आलेली असतात.

त्यानंतर, अर्जदारांना त्यांचे 3D मॉडेल पाठवण्यास सांगितले जाते. या दुसऱ्या टप्प्यात जर 3D मॉडेलला मान्यता मिळाली, तर त्या राज्यामध्ये चित्ररथ बनवण्यास सुरूवात केली जाते.

संरक्षण मंत्रालयाच्या मते चित्ररथाची निवड ही अनेक घटकांवर अवलंबून असते. जसे की, हा चित्ररथ कसा दिसेल? त्याचा लोकांवर किती परिणाम होईल? आणि चित्ररथाची संकल्पना किती खोलवर दाखवण्यात आली आहे?  चित्ररथाला कोणत्या प्रकारे संगीत जोडण्यात आले आहे? इत्यादी अनेक घटकांवर चित्ररथाची निवड अवलंबून असते.

चित्ररथांची गाईडलाईन काय आहे?

चित्ररथांची अंतिम निवड होईपर्यंत ६-७ टप्पे पार पाडावे लागतात. यासाठी अनेक दिवस लागू शकतात. सर्व पातळ्यांवर खरे उतरल्यानंतरच त्या चित्ररथाची निवड केली जाते. शिवाय, अंतिम निवड करताना काही बदल देखील निवड समितीद्वारे सुचवले जाऊ शकतात.

या संदर्भात संरक्षण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना (गाईडलाईन) जारी केली आहे. ज्यामध्ये, दोन राज्यांचा चित्ररथ एकसारखा नसावा, असे म्हटले आहे. तसेच, चित्ररथावर राज्यांच्या किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या नावांव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे लिखाण किंवा लोगोचा वापर करू नये.

शिवाय, चित्ररथावर राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचे नाव देखील इंग्रजी किंवा हिंदी भाषेत असावे. इतर भाषेतील शब्दांचा किंवा वाक्यांचा वापर चित्ररथाच्या बॉर्डरवर केला जाऊ शकतो, असे ही सांगण्यात आले आहे.

चित्ररथ बनवताना पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यास संरक्षण मंत्रालय प्राधान्य देते. तसेच, संरक्षण मंत्रालय प्रत्येक राज्यासाठी किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी एक ट्रॅक्टर आणि ट्रेलर उपलब्ध करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT