tn seshan).jpg 
देश

T.N. Seshan: शेषन यांनी निवडणूक आयोगाचा चेहरामोहरा कसा बदलला?

सकाळ ऑनलाईन

नवी दिल्ली- देशाचे दबंग निवडणूक आयुक्त ज्यांनी खऱ्या अर्थाने लोकशाहीचे महापर्व बनवले, अशा टी.एन. शेषन यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 15 डिसेंबर 1932 साली पल्लकड (केरळ) येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता. आज निवडणुकीच्यावेळी सरकार किंवा राजकीय पार्टीला आचार संहितेचे पालन करावे लागते, तर याचे श्रेय टीएन शेषन यांना जाते. त्यांनी निवडणूक आयोगाला तिच्या खऱ्या ताकदीची ओळख करुन दिली आणि निवडणुकीसंबंधी काही सुधारणा लागू करुन लोकशाहीचा पाया मजबूत करण्याचे काम केले. टी.एन. शेषन यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ... 

शेषन यांचे शालेय शिक्षण पल्लक्कडमध्येच झाले. त्यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून फिजिक्समध्ये पदवी घेतली. त्यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्येच 1952 साली प्राध्यापकाची नोकरी धरली, सोबतच त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेचा अभ्यास सुरु केला. 1953 मध्ये त्यांनी पोलिस सेवा परीक्षेमध्ये टॉप केले आणि 1954 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेसाठी होणारी परीक्षा क्लियर केली. 1955 साली त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत ट्रेनी म्हणून आपले करियर सुरु केले. 

UKच्या पंतप्रधानांनी स्वीकारलं भारताचं निमंत्रण; येत्या प्रजासत्ताक दिनी असतील...

शेषन यांची पहिली ड्यूटी तमिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यात डिंडीगलमध्ये कलेक्टर म्हणून लागली. तेथे हरिजन समुदायाच्या एका व्यक्तीचे काँग्रेस पार्टीच्या स्थानिक अध्यक्षासोबत लग्न झाले होते. या व्यक्तीवर निधीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप होता. त्याला टीएन शेषन यांना अटक करावी लागली. अटकेनंतर काही दिवसांनी एका मंत्र्यांने या भागाचा दौरा केला. त्यांनी शेषन यांच्यावर दबाव आणत त्याला सोडण्याची मागणी केली. पण, शेषन शेवटपर्यंत मंत्र्याच्या दबावासमोर झुकले नाहीत.

1962 मध्ये शेषन यांचे त्यांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी भांडण झाले, त्यामुळे त्यांचे सचिवालयामध्ये ट्रान्सफर करण्यात आले. तेथून त्यांना मागास वर्ग कल्याण आणि महिला कल्याण विभागात पाठवण्यात आले. शेवटी त्यांना शहर परिवहन निर्देशक बनवण्यात आले. त्यांचा प्रामाणिकपणा आणि कर्तव्य निष्ठेची किर्ती तत्कालीन उद्योग आणि परिवहन मंत्री रामास्वामी वेंकटरमन यांच्यापर्यंत पोहोचली. वेंकटरमन यांनी त्यांना गर्दीच्या शहरात सार्वजनिक बस व्यवस्था संभाळण्यासाठी सांगितले. शेषन या घटनेला खूप महत्वाची मानतात. ते सांगतात याठिकाणी त्यांनी अनेक प्रकारच्या लोकांना संभाळलं, त्याचा फायदा त्यांना भविष्यात झाला. 

प्रधानमंत्री चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये सुब्रमण्यन स्वामी कायदा मंत्री होते, जे शेषन यांचे मित्र होते. सुब्रमण्यन स्वामी यांनी शेषन यांना मुख्य निवडणूक आयुक्त पदाची ऑफर दिली. सुरुवातीला त्यांनी ही ऑफर नाकारली पण, नंतर राजीव गांधी, तत्कालीन राष्ट्रपती आर. वेंकटरमन, आपले मोठे बंधू आणि सासऱ्याच्या सल्ल्यांने त्यांनी 1990 साली मुख्य निवडणूक आयुक्तपदाची धूरा संभाळली. यानंतर त्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्या सुधारणा केल्या, त्यामुळे त्यांचे नाव इतिहासात अमर झाले. 

आज देशात जवळजवळ 99 टक्के मतदारांकडे ओळखपत्र आहे, त्याचे श्रेय शेषन यांच्याकडे जाते. त्यांच्या कार्यकाळात याची सुरुवात झाली आणि 1996 पर्यंत याचे फळ दिसून येऊ लागले. यामुळे खोटे मतदान रोखण्यासाठी मोठी मदत झाली. 90 च्या दशकात बिहार, यूपी आणि दिल्लीसारख्या शहरांतील लोक तक्रार करायचे की मतदानासाठी गेलो, पण आधीच आमचं मत टाकण्यात आलं होतं. ही तक्रार त्यानंतर बऱ्यापैकी बंद झाली. 

Facebook Fuel For India 2020 :भारताच्या डिजीटल भविष्याबाबत अंबानी-झुकेरबर्ग...

शेषन निवडणूक आयुक्त बनण्याआधी आचार संहिता केवळ नावापूर्ती होती, पण शेषन यांनी याची कठोरपणे अंमलबजावणी सुरु केली. निवडणूक प्रचारावेळी नियमांचे पालन व्हायचे नाही. त्यामुळे उमेदवार ठरवून दिलेल्या मर्यादेच्या बाहेर खर्च करायचा. आचार संहिता लागू झाल्यानंतर आयोगाची प्रचारावर बारिक नजर राहू लागली. रात्री दहानंतर प्रचार करण्यावर बंदी आली. उमेदवारांना निवडणूक खर्च नियमित देणे अनिवार्य करण्यात आले. त्यामुळे उमेदवारांच्या खर्चावर मर्यादा आली. पक्ष आणि उमेदवारांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी पर्यवेक्षक तैनात करण्याच्या पद्धतीला शेषन यांनीच कठोरपणे लागू केले. 

शेषन यांनी निवडणुकीदरम्यान केंद्रीय सेनादलांची तैनाती प्रभावी केली. त्यामुळे राज्याचे पोलिस आणि प्रशासनाच्या जीवावर मनमानी करण्याच्या नेत्यांच्या सवयींवर रोख आली. शेषन यांनी नेत्यांवर सक्ती केली, दुसरीकडे त्यांनी मतदारांना भीतीमुक्त मतदान करण्याचे वातावरण निर्माण करुन दिले. त्यांनी मतमोजणी करण्याआधी  वोट मिक्स करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे जिंकणारा नेता बदल्याच्या भावनेने काम करत नाही.  

(edited by- kartik pujari)


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेंचा पराभव निश्चित, चौदाव्या फेरी अंती तिसऱ्या स्थानी

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Atul Bhatkhalkar Won Kandivali East Assembly Election : कांदिवली पूर्व विधानसभेत बीजेपीच्या अतुल भातखळकरांची विजयी हॅट्रिक !

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

SCROLL FOR NEXT