Five Assembly Elections 
देश

पाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी कशी? लोक किती समाधानी?

पुढील महिन्यात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पुढील महिन्यात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका (Assembly Elections) पार पडणार आहेत. पण या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी कशी राहिली आहे? कोण जनतेमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे? याबाबत इंडिया टुडेनं सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) अव्वलस्थानी आहेत तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) कारभार सर्वात कमी लोकांना आवडल्याचं दिसतंय. (How was work of Chief Ministers of five states See what the survey says)

पुढील महिन्यात पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. तर १० मार्च रोजी या सर्व राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. यापार्श्वभूमीवर India today नं केलेल्या सर्व्हेक्षणात या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर लोक किती समाधानी आहेत, हे समोर आलंय.

Yogi Adityanath

उत्तर प्रदेश -

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संपूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळातील कामगिरीवर ४९ टक्के लोक पूर्ण समाधानी आहेत तसेच १७ टक्के लोक काही प्रमाणात समाधानी आहेत. तर ३४ टक्के लोक हे त्यांच्या कामगिरीवर आजिबात समाधानी नाहीत.

Charanjeet Singh Channi

पंजाब -

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळून केवळ चारच महिने झाले आहेत. त्यांच्या या चार महिन्याच्या कामगिरीवर ३३ टक्के लोक पूर्ण समाधानी आहेत तसेच ३० टक्के लोक काही प्रमाणात समाधानी आहेत तर ३७ टक्के लोक हे आजिबात समाधानी नाहीत.

Pushkar-Singh-Dhami

उत्तराखंड -

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनीही सहा महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला होता. त्यांच्या या कार्यकाळातील कामगिरीवर ४१ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केलंय तर २६ टक्के लोकांनी काही प्रमाणात समाधान व्यक्त केलंय तर ३४ टक्के जनतेनं त्यांच्या कामगिरीवर असमाधान व्यक्त केलंय.

Pramod Sawant

गोवा -

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा जवळपास तीन वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ राहिला आहे. या काळातील त्यांच्या कामगिरीवर २७ टक्के लोक समाधानी आहेत. काही प्रमाणात समाधानी असलेले लोक ३९ टक्के आहेत. तर ३४ टक्के लोक त्यांच्या कामगिरीवर आजिबात समाधानी नाहीत.

N Biren Singh

मणिपूर -

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कामगिरीवर ३९ टक्के लोक समाधानी आहेत. २८ टक्के लोक काही प्रमाणात समाधानी आहेत तर ३३ टक्के लोक असमाधानी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT