Amartya Sen sakal
देश

Amartya Sen : विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल यांचा कस लागणार;अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचे प्रतिपादन, पंतप्रधानपदाबाबत बोलणे टाळले

सकाळ वृत्तसेवा

बोलपूर (पश्चिम बंगाल) : ‘‘ राहुल गांधी हे आता अधिक समंजस आणि प्रगल्भ राजकारणी होत चालले असून विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांचा कस लागणार आहे,’’ असे प्रतिपादन नोबेल विजेते ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी केले आहे. राहुल यांच्या भारत जोडो यात्रेने केवळ त्यांना राष्ट्रीय नेताच बनविले नाही तर देशाची राजकीय भूमी देखील समृद्ध केली असल्याचे सेन यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले.

राहुल हे जेव्हा केम्ब्रिजमधील ट्रिनिटी कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हा त्यांना नेमके काय करायचे? हे माहिती नव्हते. तेव्हा त्यांना राजकारणाचे देखील फारसे आकर्षण नव्हते. आता ते प्रगल्भ राजकारणी बनले आहेत. मी देखील ट्रिनिटी कॉलेजमध्ये अध्यापक म्हणून काम करत होतो. तेव्हा राहुल यांची भेट होत असे सेन यांनी नमूद केले. प्रारंभीच्या काळात राहुल यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागले पण जसजसा काळ पुढे जात गेला तशी त्यांच्या कामगिरीमध्ये सुधारणा होत गेल्याचे दिसून आले. आताची त्यांची कामगिरी अतिशय उत्कृष्ट स्वरूपाची म्हणावी लागेल असे प्रशस्तिपत्र सेन यांनी त्यांना दिले. राहुल यांच्याकडे तुम्ही देशाचे भावी पंतप्रधान म्हणून पाहता का? असे विचारले असता सेन यांनी स्मित हास्य केले. ‘यावर मी काहीही उत्तर देणार नाही,’ असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

डॉ.सिंग बनले पंतप्रधान

‘‘एखादी व्यक्ती पंतप्रधान कशी बनते?’ यावर बोलणे अवघड असते असेही त्यांनी नमूद केले. ‘‘ माझ्या विद्यार्थ्यांपैकी कोण पंतप्रधान होईल? असा प्रश्न जर मला त्याकाळी कोणी विचारला असता तर मी मनमोहनसिंग यांचे नाव सुचविले असते कारण त्यांना राजकारणामध्ये काडीचाही रस नव्हता पण नंतर तेच पंतप्रधान बनले आणि त्यांनी त्यांच्यापरीने चांगले काम केले. त्यामुळे पंतप्रधान कोण होणार? यावर भाष्य करणे खूप अवघड असते,’’ असे सेन म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal यांची तिहार तुरुंगातून सुटका, जेलमधून बाहेर येताच म्हणाले- देशाचे विभाजन करून...

IND vs BAN, 1st test: गौतम सरांनी विराटकडून करून घेतला 45 मिनिटे सराव, जसप्रीत बुमराहने तर...

Amitabh Bachchan : गरीब म्हणून लंडनमधील दुकानदाराने केला बिग बींचा अपमान ; अमिताभ यांनी दिलं असं प्रत्युत्तर

साऊथ आशियाई ज्युनियर चॅम्पियन स्पर्धेत; सामान्य कुटुंबातील प्राचीची सुवर्ण भरारी

बीड हादरलं! जबरदस्तीने अत्याचार, नंतर व्हिडिओ करून पालकांना पाठवला अन्... 'त्या' तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT