गेल्या वर्षभरापासून देशात रेल्वे अपघात झपाट्याने वाढले आहेत. इतकेच नव्हे तर अपघातांची मालिकाच सुरू झाली आहे.
दरम्यान आज पहाटे हावडा-मुंबई मेल बारांबू स्थानकाजवळ मालगाडीला धडकली आणि त्यातील 20 डबे रुळावरून घसरले. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.
दरम्यान या अपघातानंतर तब्बल 14 वर्षांनी म्हणजेच 2010 साली घडलेल्या 'ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस' अपघाताच्या भयानक आठवणी ताज्या झाल्या आहेत. ज्यामध्ये सुमारे 150 प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले होते.
पश्चिम बंगालमधील पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात 28 मे 2010 रोजी ज्ञानेश्वरी एक्सप्रेस रुळावरून घसरली होती. हा ट्रॅकवर बॉम्ब फोडून किंवा त्याची तोडफोड करून केलेल्या नुकसानीमुळे हा भीषण अपघात झाल्याचे म्हटले जाते.
त्यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (माओवादी) त्या भागात चार दिवसांच्या बंदचे आयोजन केले होते. पोलिसांनी सांगितले होते की, सुमारे 46 सेमी लांबीचा ट्रॅक माओवादी-नक्षलवाद्यांनी काढला होता. दुपारी 1:30 वाजता हावडाहून मुंबईला जाणारी 13 डब्यांची ज्ञानेश्वरी सुपर डिलक्स एक्स्प्रेस ट्रेन रुळावरून घसरली आणि अपघात घडला.
यामध्ये सुमारे 150 लोक मारले गेले आणि 200 हून अधिक लोक जखमी झाले होते. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली होती.
दरम्यान या अपघाताल आता 14 वर्षे होऊन गेले आहेत. तरीही काहींना यातील नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा दावा अपघातातील पीडितांनी केला आहे. तर काही लोकांना त्यांच्या नातेवाईकांचे मृत्यूचे प्रमाणपत्रही मिळाले नसल्याचे आरोप केले जातात.
हा अपघात घडवण्यात हात असलेल्या काही माओवाद्यांना आतापर्यंत एन्काउंटरमध्ये मारले असल्याचेही समोर आले आहे. तर अपघातात मृत्यू झालाचे सांगण्यात आलेला एक व्यक्ती 2021 मध्ये जिवंत सापडला होता. या व्यक्तीच्या बहिणीने सरकारकडून नुकसान भरपाई आणि सरकारी नोकरीही मिळवली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.