Amit Shah JP Nadda Sakal
देश

HP Election Results 2022: नड्डांच्या होमपीचवर भाजपनं गमावली सत्ता! काय आहेत कारणं?

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये भाजपनं सत्ता गमावली तर काँग्रेसनं बहुमत गाठलं.

सकाळ डिजिटल टीम

Himachal Pradesh Election Results 2022: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये भाजपनं सत्ता गमावली असून काँग्रेसनं बहुमत गाठलं आहे. पण विशेष म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा याचं हे होमपीच आहे. आपल्याच राज्यात ते भाजपला यश मिळवून देऊ शकले नाहीत. याचीच आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. पण यामागेही बरीच कारणं आहेत. काय आहेत ही कारणं जाणून घेऊयात. (HP Election Results 2022 BJP lost power on JP Nadda home pitch need to know reasons)

भाजपमध्ये अंतर्गत वाद

निवडणुकीपूर्वी हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्री बदलाची मागणी होत होती. पण भाजपच्या हायकमांडनं याकडं दुर्लक्ष केलं. भाजपच्या प्रचारासाठी केंद्री मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक मंत्री हिमाचल प्रदेशात ठाण मांडून बसले होते. राजकीय वर्तुळात अशी चर्चा होती की यंदाही हिमाचलमध्ये सरकार बदलणार हे भाकितही खरं ठरलं. गेल्यावर्षी हिमाचलमध्ये १ लोकसभेची जागा आणि ३ विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीत भाजपाला मोठी हार मानावी लागली होती. या चारही जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला होता.

भाजपचा वोट शेअर एक टक्क्यांहून कमी - नड्डा

हिमाचलच्या निकालावर नड्डा म्हणाले, हिमाचलच्या कार्यकर्त्यांनी मोठी मेहनंत केली. यापूर्वी सरकार बदलायचं तेव्हा पाच टक्के मतदानात फरक पडायचा पण यंदा आमचं सरकार बदललं. आम्हाला एक टक्क्याहून कमी वोट शेअरचा फटका बसला, त्यामुळं भाजपला लोकांना जिंकवायचं होतं पण थोडक्यात आमचा विजय हुकला.

दरम्यान, हिमाचल प्रदेशातील ६८ जागांपैकी ४० जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला असून २५ जागांवर भाजपचा विजय झाला. आपला इथं एकही जागा मिळाली नाही, पण तीन जागा इतर पक्षांच्या पारड्यात पडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT