Humans of Bombay Controversy eSakal
देश

Humans of Bombay : चोराच्याच घरी चोरी? काय आहे 'पीपल ऑफ इंडिया' आणि 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे' वाद? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Humans of NY : ह्यूमन्स ऑफ बॉम्बे, पीपल ऑफ इंडिया आणि ह्यूमन्स ऑफ न्यूयॉर्क या तीन सोशल मीडिया हँडल्समध्ये सध्या मोठा वाद सुरू आहे.

Sudesh

सोशल मीडियावरील तीन स्टोरीटेलिंग प्लॅटफॉर्म सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. ह्यूमन्स ऑफ बॉम्बे, पीपल ऑफ इंडिया आणि ह्यूमन्स ऑफ न्यूयॉर्क या तीन सोशल मीडिया हँडल्समध्ये सध्या मोठा वाद सुरू आहे. हा वाद नेमका काय आहे, आणि याची सुरुवात कुठे झाली; याबाबत जाणून घेऊया.

ह्यूमन्स ऑफ बॉम्बे हे सोशल मीडिया हँडल भरपूर प्रसिद्ध आहे. वेगळ्या धाटणीची स्टोरीटेलिंग पद्धत, आणि वेगवेगळे विषय यामुळे याठिकाणी पोस्ट होणारे आर्टिकल्स भरपूर लोकप्रिय आहेत. पीपल ऑफ इंडिया हेदेखील अशाच प्रकारच्या स्टोरीज पोस्ट करणारं हँडल आहे.

ह्यूमन्स ऑफ बॉम्बेने काही दिवसांपूर्वी पीपल ऑफ इंडिया विरोधात कोर्टात धाव घेतली होती. आपली स्टोरीटेलिंगची पद्धत, काही विषय आणि फोटो-व्हिडिओ देखील कॉपी केल्याचा आरोप HOB ने केला होता. याविषयी दिल्ली उच्च न्यायालयाने पीपल ऑफ इंडियाला नोटीस जारी केली होती. तसंच, याबाबत पुढील सुनावणी 11 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

मात्र, हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. HOB आणि POI या वादामध्ये अचानक 'ह्यूमन्स ऑफ न्यूयॉर्क' या हँडलच्या फाउंडरने उडी घेतली. ब्रँडन स्टँटन यांनी सर्वात आधी HONY ची स्थापना केली होती. ह्यूमन्स ऑफ बॉम्बेची स्टोरीटेलिंग पद्धत ही यापासूनच प्रेरित होऊन तयार झाली आहे. ब्रँडन यांनी थेट HOB वरच हल्ला चढवला.

काय म्हणाले ब्रँडन?

"ह्यूमन्स ऑफ बॉम्बेने आतापर्यंत खूप चांगल्या आणि महत्त्वाच्या स्टोरीज कव्हर केल्या आहेत. त्यामुळे मी आतापर्यंत त्यांना काहीच बोललो नव्हतो. मात्र मी तुम्हाला ज्या गोष्टीसाठी माफ केलं आहे, त्याच गोष्टीसाठी तुम्ही दुसऱ्या कोणालातरी कोर्टात खेचणं बरोबर नाही.." अशा आशयाची पोस्ट ब्रँडन यांनी आपल्या एक्स (ट्विटर) हँडलवरून शेअर केली होती.

करिश्मा मेहता ट्रोल

ब्रँडन यांच्या पोस्टनंतर ह्यून्स ऑफ बॉम्बेच्या फाऊंडर करिश्मा मेहता या मोठ्या प्रमाणात ट्रोल होऊ लागल्या. ह्यूमन्स ऑफ बॉम्बेने स्वतःच ह्यूमन्स ऑफ न्यूयॉर्कची कॉपी केली; आणि आता ते पीपल ऑफ इंडियावर आपली कॉपी केल्याचा आरोप करत आहेत. हे म्हणजे Abibas आणि Adibas कंपनीमध्ये Adidas कंपनीची कॉपी केल्याबद्दल भांडण झाल्यासारखं आहे; असं एका एक्स यूजरने म्हटलं आहे.

ह्यूमन्स ऑफ बॉम्बेची सारवासारव

या सर्व ट्रोलिंगनंतर ह्यूमन्स ऑफ बॉम्बेने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ब्रँडनला एक ओपन लेटर लिहित त्यांनी आपल्या केसबद्दल माहिती दिली. सोबतच, एका एक्स पोस्टमध्ये त्यांनी ब्रँडन यांचे आभार देखील मानले आहेत.

ही स्टोरीटेलिंग चळवळ सुरू करण्यासाठी आम्ही ब्रँडन आणि HONY चे आभार मानतो. आमची केस ही स्टोरीटेलिंगच्या पद्धतीबद्दल नाही, तर चोरलेल्या कंटेंबद्दल आहे. आम्ही कोर्टात जाण्यापूर्वी हे प्रकरण मैत्रीपूर्ण पद्दतीने सोडवण्याचा प्रयत्न देखील केला होता. असंही HOB ने स्पष्ट केलं आहे.

सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

या सगळ्यात ह्यूमन्स ऑफ बॉम्बेच्या फाउंडर करिश्मा मेहता यांचा एक जुना व्हिडिओ देखील व्हायरल होतो आहे. यामध्ये त्या या पेजची संकल्पना आपल्याला अचानक सुचल्याचं म्हणत आहेत. त्यामुळेच सोशल मीडियावर HOB विरोधात मोठ्या प्रमाणात मीम्स व्हायरल होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT