नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाचा जागतिक विक्रम करण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या भारताने आजअखेर ९७ कोटी ७३ लाखांचा टप्पा गाठला. शंभर कोटी म्हणजेच एक अब्ज लसीकरणाचे उद्दिष्ट येत्या दोन-तीन दिवसात पूर्ण करून हा विक्रम धुमधडाक्यात साजरा करण्याची जय्यत तयारी केंद्र सरकारने केली आहे.
भारत शतकोटी लसीकरणाच्या उंबरठ्यावर आहे, अशी माहिती भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी तीनच दिवसांपूर्वी दिली होती. राष्ट्रीय मोफत लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर दहा महिन्यातच भारताने शंभर कोटींचा टप्पा गाठलेला आहे. दररोज सुमारे ११ ते १५ लाख इतके लसीकरण सुरू आहे. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यानंतरच्या अडीचशे दिवसांमध्ये भारताने ८३ लाख नागरिकांचे लसीकरण केल्याचे केंद्राने म्हटले आहे.
मोदी सरकारने आता शतकोटी कोरोना लसीकरणाच्या विक्रमाचा सोहळा करण्याची जंगी तयारी केली आहे. या अंतर्गत रेल्वे स्थानके, विमानतळ, तसेच विशिष्ट विमान कंपन्यांच्या विमानांमध्ये भारताने शतकोटी लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य केल्याची उद्घोषणा पुढचे काही दिवस सातत्याने करण्यात येणार आहे. ‘कोविड ॲप’वर १०० कोटी म्हणजे एक अब्ज लसीकरणाबाबतची उलट गणती दाखवणारे आकडे वेगाने पळत आहेत. ज्यावेळी हा ऐतिहासिक क्षण येईल त्यावेळी त्याची उद्घोषणा देशभरातील रेल्वे स्थानके, बस स्थानके, विमानतळे, मेट्रो स्थानके यांच्यावर एकाच वेळी करण्यात येईल. लसीकरणाचा विक्रम केल्यानंतरदेखील कोरोनासुराचा संपूर्ण नायनाट होईपर्यंत भारतीयांनी पहिल्यासारखीच आरोग्य काळजी कशी घ्यावी याची जागृती करणारी घोषणा आता मोबाईलवर येईल. एक अब्जावी लस दिली जाईल, तो ‘आम आदमी’ही ‘खास’ असणार आहे.
विक्रमाची अशी तयारी
स्पाइस जेट विमानांमध्ये आरोग्य सेवकांची आणि कोरोना योद्ध्यांची छायाचित्रे लावणार
खादी इंडियाने तयार केले मोठमोठे राष्ट्रध्वज. विक्रमाच्या दिवशी ते नॉर्थ- साउथ ब्लॉक, लाल किल्ला आणि ऐतिहासिक स्मारकांवर फडकाविले जातील.
प्राण गमावलेल्या कोरोना योद्ध्यांच्या नातेवाइकांचा भाजप गौरव करणार
आरोग्य मंत्रालयाकडून विशेष ‘लसीकरण गीत’ तयार. प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी ते गायले आहे.
आतापर्यंतचे लसीकरण
पहिला डोस घेतलेले : ६९, ६०,६१,२३५
दोन्ही डोस घेतलेले : ८७,८३,६६५
आरोग्य सेवक
दुसरा डोस घेतलेले : २८, १३, १४,०३०
पहिला डोस घेतलेले कोरोना योद्धे : १, ८३, ४७, २२१
एक डोस घेतलेले आरोग्य सेवक : १,०३,७०,१६७
दोन्ही डोस घेतलेले कोरोना योद्धे : १,४६, ६६, ९६
एकूण : ९७,७३,७५,२६५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.