चार महिन्यांपूर्वी वडिलांनी आपल्या मुलीचे लग्न (Marriage) लावून दिले. मात्र, काही दिवसांनीच पती-पत्नीमध्ये भांडण व्हायला लागले. यामुळे पतीने पत्नीला तिच्या प्रियकराच्या गावी नेऊन सोडले. मात्र, लग्नात दिलेला हुंडा परत देत नसल्याचे वडिलांचे म्हणणे आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये अजीमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावात घडली. (Husband leaves wife in lovers village)
प्राप्त माहितीनुसार, लग्नाच्या काही दिवसांनीच पतीला पत्नीचे लग्नापूर्वी युवकाशी प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. यामुळे तो चिडला होता. यामुळे त्याने पत्नीला लग्नाला जायचे असल्याचे सांगून तयार होण्यास सांगितले. लग्नाला जाण्यासाठी निघाले असता वाटेत पतीने पत्नीला प्रियकराच्या (lover) गावी सोडून निघून गेला. मात्र, लग्नात मिळालेला हुंडा दिला नाही.
जावयाच्या या कृत्यामुळे मुलीचे वडील चंदरपाल हे समाजात अपमानित झाल्यामुळे खूप निराश झाले होते. परंतु, रक्त आणि घामाच्या कमाईतून मुलीला हुंडा (Marriage) दिला. तो हुंडा जावई कोणत्याही स्थितीत परत करण्यास तयार नाही. जावयाने लग्नात दिलेला हुंडा परत दिला तर मुलीचे दुसऱ्या युवकाशी लग्न (Marriage) करून देऊ शकेल. लग्नानंतर हुंड्यासाठी मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. हुंडा मागायला गेल्यावर आम्हाला हाकलण्यात आले, असा आरोपही मुलीच्या वडिलांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.