Lift Rule for House Maids eSakal
देश

Lift Rule for House Maids : 'कामवाल्या बाईंनी वापरु नये पॅसेंजर लिफ्ट, सापडल्यास हजार रुपये दंड'; फोटो व्हायरल

Hyderabad Lift Photo : या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

Sudesh

Hyderabad Society Lift Rule : आजकाल कित्येक घरांमध्ये पती-पत्नी दोघेही कामाला जात असल्यामुळे; घरातील कामांसाठी कामवाल्या बाईंवरच अवलंबून रहावं लागतं. घरगुती काम करणारे, डिलिव्हरी बॉईज या सर्वांमुळे शहरातील कित्येकांचं जीवन सुसह्य झालं आहे. मात्र आपल्यासाठी काम करत असले, तरी हे लोक आपल्याप्रमाणेच माणसं असल्याचा विसर काहींना पडत असल्याचं दिसत आहे.

हैदराबादमध्ये असणाऱ्या एका सोसायटीच्या लिफ्टमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये सोसायटीने आपला विचित्र नियम दिलेला आहे. "डिलिव्हरी बॉईज, कामवाल्या बाई आणि कामगारांनी पॅसेंजर लिफ्टचा वापर करू नये. करताना आढळल्यास त्यांना 1,000 रुपये दंड ठोठावला जाईल." असं या लिफ्टमध्ये लिहिलं आहे.

शाहीना आत्तारवाला या एक्स (ट्विटर) हँडलवरुन हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. शाहीना लिहितात, की "या समाजात आपण सर्वच आपली काळी आणि घाणेरडी बाजू लपवून ठेवत असतो. कष्टकरी आणि कामगार लोक आपल्यासोबत उभं राहू शकत नाहीत, असं बऱ्याच जणांना वाटतं असतं. त्यांनी असं करणं म्हणजे गुन्हा असल्यासारखं आपण वागत आहोत. 1,000 रुपये हा यांच्यापैकी कित्येकांच्या पगाराचा 25% भाग असू शकतो."

सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया

शाहीना यांनी पोस्ट केलेला फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. त्यांच्या या फोटोवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. सर्वांना समान वागणूक द्यायला हवी. या सोसायटीने लागू केलेला नियम अतिशय निर्दयी आहे, असं काही नेटिझन्स म्हणत आहेत. तर, कित्येक सोसायटींमध्ये कामगारांसाठी वेगळी सर्व्हिस लिफ्ट असते; त्यात एवढं काय? अशा प्रतिक्रिया देखील पहायला मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : मविआचा विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव का झाला? शरद पवार यांनी सांगितली 'ही' कारणं

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर शरद पवारांची पत्रकार परिषद

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू! जाणून घ्या पहिल्या सत्रात कोणाला लागल्या बोली

Daund Assembly Election 2024 Result : दौंड विधानसभा निवडणुकीत एकाच कुटुंबात विजयाच्या दोन हॅटट्रीक; कुल पिता-पुत्रांसाठी जनादेश

Junior National Kho Kho Championship स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर; भरतसिंग वसावे आणि सुहानी धोत्रे कर्णधार

SCROLL FOR NEXT