आई वडील आयुष्यभर थोडी रक्कम बाजूला ठेवत मुलीचं लग्न थाटामाटात करतात. मुलासाठीही सेव्हींग करतात. ते आपल्या म्हातारपणाचा आधार होतील असे वाटते. पण, वृद्ध झालेले आई-वडीलांना वृद्धाश्रमात घालून त्यांच्याच प्रॉपर्टीवर हक्क गाजवणारे महाभाग या जगात खूप आहेत.
पण, जगात असेही अनेक लोक आहेत ज्यांना काही कारणास्तव आई-वडिलांची काळजी घेता येत नाही. पण, परिस्थिती समजून न घेता खास पंचायतीने एक असा निर्णय दिला आहे. जो कोणालाच पटलेला नाही.
तेलंगणामधील एका घटनेत आईचा सांभाळ करण्यास सक्षम नसलेल्या एका सासरवाशीन मुलीला खाप पंचायतीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहेत. काय आहे नक्की घटना पाहुयात
तेलंगणातील एका आईचे वय 96 असून तिची प्रकृती बिघडली होती. त्याच दरम्यान त्यांची 68 वर्षीय मुलगी मलम्माचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले होते. ज्या दिवशी ऑपरेशन झाले त्याच दिवशी अचानक मलाम्माच्या आईची प्रकृतीही बिघडली.
मोतिबिंदूच्या ऑपरेशनमुळे मलम्मा आपल्या आईची काळजी घेण्यासाठी रूग्णालयात जाऊ शकली नाही. त्यातून गैरसमज निर्माण झाला. त्यामूळे मलम्मांच्या दोन भावांनी याबद्दल खाप पंचायतीत तक्रार दाखल केली.
तेलंगणाच्या जात खाप पंचायतीने घटनाक्रम ऐकून घेत मलम्मा यांना दोषी ठरवत त्यांच्यावर कारवाई केली. मल्लमा यांच्या लग्नात घातलेले तीन ग्रामचे दागिने परत आईला देण्याचा आदेश पंचायतीने दिला.
सतत फोन करून त्यांच्यावर दबाव आणला जात होता. आदेश मानत मल्लमा यांना हैदराबादपासून 266 किमी दूर असलेल्या वारंग येथे लग्नात मिळालेले तीन ग्राम दागिने परत करण्यासाठी जावे लागले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.