Hyderabad no more capital of Andhra Pradesh will be the capital of Telangana from today marathi News  
देश

Hyderabad News : हैदराबाद आजपासून नसणार आंध्र प्रदेशची राजधानी; दहा वर्षांचा करार संपुष्टात

सकाळ वृत्तसेवा


हैदराबाद, ता. २ (पीटीआय) ः देशातील प्रमुख महानगरांपैकी एक असलेले हैदराबाद हे तेलंगण राज्याच्या निर्मितीनंतर आंध्र प्रदेश व तेलंगण या दोन्ही राज्यांची गेली दहा वर्षे संयुक्त राजधानी होती. हा दहा वर्षांचा करार संपुष्टात आला असून आजपासून (ता.२) हैदराबाद केवळ तेलंगणची राजधानी असेल. आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा, २०१४ नुसार हैदराबाद संयुक्त राजधानी करण्यात आली होती.

आंध्र प्रदेशचे २०१४ मध्ये विभाजन करण्यात आल्यानंतर दोन्ही राज्यांसाठी पुढील दहा वर्षे ही एकच राजधानी होती. आंध्रचे विभाजन करून २ जून २०१४ मध्ये स्वतंत्र तेलंगण राज्य स्थापन करण्यात आले होते. आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यात २ जून २०१४ पासून पुढील दहा वर्षांसाठी तेलंगण व आंध्र प्रदेशची संयुक्त राजधानी असेल, असे नमूद करण्यात आले होते. हा कालावधी दहा वर्षांपेक्षा अधिक नसावा. कायद्यातील पोट-कलम (१) मध्ये नमूद केलेला हा कालावधी संपल्यानंतर हैदराबाद ही केवळ तेलंगणची राजधानी असेल आणि आंध्र प्रदेश राज्यासाठी नवीन राजधानी असेल, असेही या कायद्यात म्हटले होते.

सुमारे दशकभरच्या संघर्षानंतर आंध्र प्रदेशमधून स्वतंत्र तेलंगण राज्याची निर्मिती करण्यात आली होती. त्यासाठी, फेब्रुवारी २०१४ मध्ये आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयक संमत करण्यात आले होते. हैदराबादेतील लेक व्ह्यु सरकारी आतिथीगृहांसह आंध्र प्रदेशला दहा वर्षांसाठी दिलेल्या इतर इमारती २ जून नंतर ताब्यात घेण्याचे निर्देशही तेलंगणचे मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांनी नुकतेच अधिकाऱ्यांना दिले होते.

मालमत्तेच्या विभाजनासह अनेक प्रश्न कायम

आंध्र प्रदेशातून स्वतंत्र तेलंगणची निर्मिती झाल्यानंतर दहा वर्षांनीही दोन्ही राज्यांत मालमत्तेच्या विभाजनासह इतर अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. विभाजनाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चेसाठी मंत्रिमंडळ बैठक बोलाविण्याची मागणी तेलंगणने केली होती. मात्र, लोकसभेच्या आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाने त्याला मान्यता दिली नव्हती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT