I am asked to comment on the Chintan camp I am asked to comment on the Chintan camp
देश

प्रशांत किशोर म्हणाले, मला चिंतन शिबिरावर भाष्य करण्यास सांगितले जाते

सकाळ डिजिटल टीम

मला वारंवार उदयपूर चिंतन शिबिराच्या निकालावर भाष्य करण्यास सांगितले जात आहे. माझ्या मते स्थिती सुधारणे आणि काँग्रेस नेतृत्वाला थोडा वेळ देणे याशिवाय अर्थपूर्ण काहीही साध्य करण्यात अपयश आले. नुकतेच संपलेले काँग्रेसचे चिंतन शिबिर अपयशी ठरले आहे, असे प्रशांत किशोर (Prashant kishor) ट्विटमध्ये म्हणाले. (I am asked to comment on the Chintan camp)

अलीकडे त्यांची काँग्रेससोबतची प्रदीर्घ चर्चा निष्फळ ठरली. यानंतर पीके यांनी काँग्रेसबद्दल म्हटले होते की, त्यांच्या नेत्यांना विश्वास आहे की जनता स्वतः सरकार उलथवून टाकेल आणि त्यांना सत्ता मिळेल. काँग्रेस (Congress) प्रदीर्घ काळ सत्तेत असून विरोधी पक्षात कसे राहायचे हेच कळत नसल्याचे प्रशांत किशोर म्हणाले होते.

काँग्रेसच्या (Congress) लोकांमध्ये समस्या असल्याचे मला दिसत आहे. त्यांचा असा विश्वास आहे की आम्ही देशावर दीर्घकाळ राज्य केले आणि जेव्हा लोक संतप्त होतील तेव्हा ते सरकार पाडतील आणि मग आम्ही येऊ. ते म्हणतात तुम्हाला काय माहीत, आम्हाला सर्व काही माहीत आहे. आम्ही बरेच दिवस सरकारमध्ये आहोत, असेही प्रशांत किशोर (Prashant kishor) म्हणाले होते.

मागे प्रशांत किशोर नव्या पक्षाची घोषणा करतील अशी अटकळ होती. मात्र, प्रशांत किशोर यांनी आपण अद्याप पक्ष स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या त्यांचे लक्ष बिहारच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाशी संबंधित लोकांना भेटणे आहे. त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे. मी लोकांना भेटेन. जर ते लोक एकत्र आले आणि आम्हाला राजकीय पक्षाची गरज वाटली त्यानंतर पक्षाची घोषणा करू. पण हा पक्ष प्रशांत किशोरचा नसून सर्वांचा पक्ष असेल, असे प्रशांत किशोर (Prashant kishor) म्हणाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: महायुतीत तणाव? एकाच मतदारसंघात अजित पवार अन् एकनाथ शिंदेंचा उमेदवार आमने-सामने, आता प्रचार कुणाचा करणार?

Satara Elections : पाटणला 'मविआ'मध्ये बंडखोरी! 89 जणांची माघार, 109 जण रिंगणात; फलटण, वाईत दोन्ही राष्ट्रवादीतच लढत

X Block Feature : हे काय नवीन! ब्लॉक केलेल्या X अकाउंट्सवरून पाहता येणार शेअर केलेले पोस्ट अन् फॉलोवर्स,काय आहे नवं फीचर?

Latest Marathi News Updates live : राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरे यांची भेट

तुमचं लग्न का तुटलं? घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली दीप्ती देवी; म्हणाली- जेव्हा एकमेकांना समजून...

SCROLL FOR NEXT