i am tired says assam man who has cremated 400 covid19 victims 
देश

'कोरोनाच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करून थकलोय'

वृत्तसंस्था

गुवाहटी (असाम): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागत आहे. कोरोना ग्रस्तांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करून आता थकलो आहे, अशी प्रतिक्रिया एका स्मशानभूमीत काम करणाऱया कर्मचाऱयाने दिली.

रामानंद सरकार (वय 43) असे कर्मचाऱयाचे नाव असून, ते उलुबारी स्मशानभूमीत काम करतात. गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींवर ते अंत्यसंस्कार करत आहेत. त्यांनी सांगितले की, 'एप्रिल महिन्यापासून कोरोनाच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहे. सुरवातील एक-दोन मृतदेह येत होते. पण, दिवसेंदिवस आकडा वाढत चालला आहे. गेल्या महिनाभरापासून दररोज 10-12 मृतदेह येत आहेत. 400 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले असून, आता थकलो आहे. कोरोना कधी संपणार काय माहित?'

दरम्यान, आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. रुग्णांबरोबरच मृत्युमुखी पडणाऱयांची संख्याही वाढत आहे.  आसाममध्ये १ लाख ३० हजार ८२३ जणांना आत्तापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. गुवाहाटी येथील स्मशानभूमीत आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सुमारे ४०० जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत, अशी माहिती तेथील जिल्हा प्रशासनाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: मोठी बातमी! नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा, अंगावार खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरातील तपोवन मैदानावर योगी आदित्यनाथांची आज जाहीर सभा

Winter Soup Recipe: हिवाळ्यात सकाळी नाश्त्यात प्या गरमागरम गाजर सूप! शरीर राहील उबदार, लगेच लिहा रेसिपी

Sakal Podcast: फास्ट फूडमुळे अपेंडिक्सचा धोका अधिक ते मोबाइल, लॅपटॉप वापराने टेस्टिंग थंबच्या तक्रारी वाढल्या

आजचे राशिभविष्य - 17 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT