BJP state president Nalin Kumar Kateel esakal
देश

Karnataka : दारुण पराभव होताच भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षपदावरून गोंधळ; मोदींना पत्र लिहित सोमण्णांचा पदावर दावा

कटील यांनी बळ्ळारी येथे राजीनामा दिल्याचे तोंडी सांगितले होते. त्यावर त्यांनी आज स्पष्टीकरण दिले.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय नेत्यांनाही पत्र लिहिले आहे. माझ्या उमेदवारीवर काय निर्णय होणार हे आपल्याला माहीत नाही.

बंगळूर : भाजप (BJP) प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सांगणाऱ्या नलिनकुमार कटील (Nalin Kumar Kateel) यांनी आता राजीनामा दिलाच नसल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे. त्यामुळे व्ही. सोमण्णांसह या पदासाठी इच्छुक असलेल्यांचा हिरमोड झाला आहे.

कटील यांनी बळ्ळारी येथे राजीनामा दिल्याचे तोंडी सांगितले होते. त्यावर त्यांनी आज स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी आता प्रसिद्धी पत्रक जारी करून राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रसारमाध्यमांचे वृत्त सत्यापासून दूर असल्याचेही त्यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

गोंधळ काय आहे?

विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव होऊनही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कटील यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला नाही. नवीन नेत्याची नियुक्ती निश्चित होणार असल्याचे सांगताच त्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त पसरले.

त्यावर कटील यांनी बळ्ळारी येथील कार्यक्रमात स्वत: राजीनामा दिला असल्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. याबाबतचे वृत्त सर्वत्र पसरल्याने प्रदेश भाजपने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत स्पष्टीकरण दिले. त्यात कटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही.

असं स्पष्ट करून भाजपचे प्रदेश माध्यम समन्वयक करुणाकर खसाळे म्हणाले, ‘‘कटील यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या बातम्या सत्यापासून दूर आहेत.’’

प्रदेशाध्यक्षपदावर सोमण्णांचा दावा

भाजप हायकमांडने दिलेली सर्व कामे केल्याचा दावा करणारे माजी मंत्री आणि वीरशैव लिंगायत समाजाचे नेते व्ही. सोमण्णा यांनी आता प्रदेशाध्यक्षपदावर दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर दोनदा नवी दिल्लीला गेलो आहे. माझा ४५ वर्षात केलेली कामे केंद्रीय नेत्यांना सांगितली असून आपल्याला प्रदेशाध्यक्ष बनवले पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय नेत्यांनाही पत्र लिहिले आहे. माझ्या उमेदवारीवर काय निर्णय होणार हे आपल्याला माहीत नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांचीही भेट घेतली आहे. माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्याशीही चर्चा करणार आहे. प्रदेशाध्यक्षपद दिल्यास जबाबदारी दिल्यास सर्वांना विश्वासात घेऊन कार्य करीन.

प्रदेशाध्यक्ष निवडीबाबत वरिष्ठ योग्यवेळी निर्णय घेतील. आपण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. माझ्या विधानाचा प्रसारमाध्यमांनी चुकीचा अर्थ लावला गेला आहे.

नलिनकुमार कटील, कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT