Punjab CM Charanjit Singh Channi Google
देश

PM मोदींच्या गैरसोयीबद्दल क्षमस्व मात्र शेतकऱ्यांवर लाठीचार्ज नाही: CM चन्नी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांची आज पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवर आंदोलकांमुळे सुमारे 15 ते 20 मिनिटे अडकून पडला. त्यामुळे सुरक्षेच्या कारणस्तव पंतप्रधान मोदींना पुन्हा भटिंडा विमानतळावर नेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरुन आता राजकीय वातावरण तापलं आहे. या सगळ्या घटनाक्रमाबद्दल आता पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली आहे.

त्यांनी म्हटलंय की, पंतप्रधान मोदींच्या आजच्या दौऱ्यातील सुरक्षेमध्ये काही त्रुटी आढळल्या असतील तर त्याची आम्ही चौकशी करू. पंतप्रधानांना या दौऱ्यामध्ये कोणताही धोका नव्हता. आज फिरोजपूर जिल्ह्यात दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदींना (PM Modi) परतावं लागलं याबद्दल मी खेद व्यक्त करतो. आम्ही आपल्या पंतप्रधानांचा आदर करतो. पुढे त्यांनी म्हटलंय की, गेल्या वर्षभरापासून शेतकरी शांततामय पद्धतीने आंदोलन करत आहेत. त्यामुळे मी शेतकऱ्यांवर लाठीमार करणार नाही. काल रात्री आम्ही शेतकऱ्यांशी बोललो होतो. त्यानंतर त्यांनी आंदोलन संपवलं होतं. आज अचानक फिरोजपूर जिल्ह्यात काही आंदोलक जमले होते.

पुढे ते म्हणाले की, मला आज भटिंडा येथे पंतप्रधानांचे स्वागत करायचे होते मात्र, ज्यांना माझ्यासोबत यायचे होते त्यांची चाचणी कोविड पॉझिटिव्ह आली. म्हणूनच, मी आज पंतप्रधानांना स्वीकारण्यासाठी गेलो नाही कारण मी कोरोना पॉझिटीव्ह निघालेल्या काहींच्या जवळच्या संपर्कात होतो. खराब हवामान आणि त्यांना होणारा विरोध यामुळे आम्ही त्यांना (PMO) हा दौरा थांबवण्यास सांगितलं होतं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक मार्ग बदलल्याची आम्हाला कोणतीही माहिती नव्हती. पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान सुरक्षेत कोणतीही त्रुटी नव्हती, असं पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Punjab CM Charanjit Singh Channi) यांनी स्पष्ट केलंय.

स्मृती इराणींचा हल्लाबोल

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी यावरुन काँग्रेसवर काँग्रेसवर टीका करत म्हटलंय की, या दरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी आनंदोत्सव साजरा केला, हा कशाचा आनंद होता? देशाच्या पंतप्रधानांना मृत्यूच्या पायरीशी नेलं होतं, याचा आनंद होता? सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पंजाब सरकारशी संवाद करायचा प्रयत्न केला तेंव्हा मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून कुणीही संवाद केला नाही. कशाची वाट पाहत होती काँग्रेस सरकार? मोदी जनतेच्या आशीर्वादाने पंतप्रधान झालेत. त्यांना निवडणुकीत पराभूत करा, अशा प्रकारे का करताय? असा सवालही त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT