Nagpur ka Dolly Chai Wala esakal
देश

Nagpur ka Dolly Chai Wala: आता नंबर मोदींचा! डॉलीने चाय पे चर्चा केली पण त्याला ते बिल गेट्स आहेत हे ठावूकच नव्हतं

Now Modi's number! Dolly discussed on the chai but was not sure it was Bill Gates: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी मीम्सच्या जगात प्रसिद्ध असलेल्या डॉली चायवाला यांची भेट घेतली. बिल गेट्स यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डॉलीच्या टपरीचा व्हिडिओही शेअर केला आहे. डॉलीला माहित नव्हते की तो कोणाला चहा देत आहे. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना चहा देण्याची त्यांची इच्छा आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Nagpur ka Dolly Chai Wala: चायवाला म्हटल्यावर तुम्हाला एमबीए चायवाला आठवेल, मात्र, आम्ही एमबीए चायवाल्याबद्दल बोलत नसून नागपूरच्या 'डॉली चायवाला'बद्दल बोलत आहोत. हेअरस्टाईल, कपडे आणि KTM बाइकमुळे मीम्सच्या जगात प्रसिद्ध... आणि आता डॉली चायवालाची चर्चा होत आहे कारण मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स डॉली चायवालाला भेटले होते.

आपल्या अनोख्या अंदाजाने प्रसिध्द असलेला नागपूरचा डॉली चायावाला सध्या भारत दौऱ्यावर असलेले प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांना चहाची भुरळ घातली आहे..बिल गेट्सने थेट हैद्राबादला बोलावून घेत डॉली उर्फ सुनीलच्या हाताच्या चहाचा आस्वाद घेतलाय.

विशेष म्हणजे बिल गेटस सोबत आपण भेटायला जात आहोत याची कोणतीही कल्पना डॉलीला नव्हती, फक्त विदेशातील एका व्यक्तीला भेटायचं आहे असं म्हणून डॉलीला हैदराबाद बोलावण्यात आलं होत...डॉली हा चहा विकणारा बिल गेट्सला ओळखत नव्हता, त्याला एवढाच विचार होता की कोणी परदेशी येत असेल तर तो त्यांना चहा देऊ. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना डॉली चायवालाने सांगितले.

हैदराबाद येथील एका ठिकाणी चहाच स्टॉल लावून आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलने डॉलीने चहा बनवून दिला. त्यानंतर बिल गेट्स यांनी तो व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेयर केला. डॉली घरी आल्यावर दोन दिवसांनी व्हिडिओ पाहिल्यावर त्यांच्या मित्राकडून त्याला कळलं की, त्याने कोणासोबत व्हिडिओ बनवला आहे.

डॉलीवर साउथ मूवीचा प्रभाव असल्याने तो रजनीकांतला कॉपी करत असतो. सिव्हिल लाईन येथे असलेल्या छोट्याश्या चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी मोठी रांग लागलेली असते. चहा पिल्यानंतर अनेक लोक तिच्या सोबत सेल्फी काढत असतात. त्यामुळे डॉली अगोदरच देशभरात समाज माध्यमांवर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यामुळे बिल गेट्सच्या भेटीनंतर आता तो जगप्रसिद्ध झाला आहे आणि आता डॉलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या हाताने तयार केलेली चहा पाजवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

बिल गेट्स यांना भेटल्यानंतर डॉली चायवाला उत्साहित दिसत आहे. त्यांना चहा दिल्याचा मला अभिमान वाटतो, असेही तो बोलताना म्हणाला. दरम्यान, रिपोर्टरने त्याला विचारले, तुला भविष्यात कोणाला चहा द्यायला आवडेल? यावर तो म्हणाला, मला नरेंद्र मोदीजींना चहा पाजण्याची इच्छा आहे... जर ते आमच्याकडे आले तर मी त्यांना नक्कीच चहा देईन. मला आयुष्यभर हसतमुखाने सर्वांना चहा देत राहायचे आहे. हसत रहा आणि हसवत रहा... असंही तो पुढे सांगतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unsold Player IPL Mega Auction 2025: अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, शार्दूल ठाकूर यांना फ्रँचायझींनी दाखवला 'ठेंगा'; मुंबईच्या खेळाडूचं नेमकं काय चुकलं?

IPL 2025 Auction Live: फाफ डू प्लेसिससाठी CSK-RCB आले नाहीत पुढे, तर सॅम करनला थालाच्या टीमनं स्वस्तात केलं खरेदी

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंची सारवासारव! थेट गृहमंत्री पदाची केली मागणी, म्हणाले...

MLA Siddharth Shirole : शिवाजीनगर विधानसभा नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा विकासाचा अजेंडा

Earth Axis Tilt : धक्कादायक! पृथ्वी ३१.५ इंचांनी झुकली..भारत ठरतोय कारणीभूत, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT