देश

I2U2 शिखर परिषदेची पहिली बैठक संपन्न; वाचा कोणत्या विषयांवर झाली चर्चा

आजच्या पहिल्या शिखर परिषदेपासून I2U2 ने सकारात्मक अजेंडा स्थापित केला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

I2U2 Summit : I2U2 गटातील देशांच्या नेत्यांची पहिली बैठक आज संपन्न झाली. भारत, इस्रायल, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि युनायटेड स्टेट्स (US) यांनी I2U2 गटाच्या नेत्यांची संयुक्त गुंतवणूक आणि पाणी, ऊर्जा, वाहतूक, अंतराळ, आरोग्य आणि अन्न सुरक्षा या क्षेत्रातील नवीन उपक्रमांवर विशेष लक्ष देण्यासाठी आजच्या पहिल्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या पहिल्या शिखर परिषदेपासून I2U2 ने सकारात्मक अजेंडा स्थापित केला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले. (I2U2 Summit News In Marathi)

पीएम मोदी म्हणाले की, अनेक क्षेत्रांमध्ये संयुक्त प्रकल्पांची ओळख पटवण्यात आली तसेच त्यामध्ये विकास करण्यासाठी एक रोडमॅप देखील तयार करण्यात आला असल्याचे मोदींनी सांगितले. वाढत्या जागतिक अनिश्चिततेमध्ये व्यावहारिक सहकार्यासाठी सहकारी फ्रेमवर्क एक उत्तम मॉडेल असल्याचा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला. I2U2 सह आम्ही जागतिक स्तरावर ऊर्जा सुरक्षा, अन्न सुरक्षा आणि आर्थिक वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकू असेही मोदींनी स्पष्ट केले.

I2U2 बैठकीत PM मोदी काय म्हणाले?

पीएम मोदी पुढे म्हणाले की, I2U2 अंतर्गत आम्ही जल, ऊर्जा, वाहतूक, अंतराळ, आरोग्य आणि अन्न सुरक्षा या 6 महत्त्वाच्या क्षेत्रात संयुक्त गुंतवणूक वाढवण्यास सहमती दर्शवली आहे. तसेच I2U2 ची दृष्टी आणि अजेंडा प्रगतीशील आणि व्यावहारिक आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन काय म्हणाले?

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी I2U2 गटाच्या पहिल्या बैठकीत सांगितले की, आज आपल्यासमोर असलेल्या आव्हानांमध्ये वाढत्या हवामान संकट किंवा वाढत्या अन्न असुरक्षिततेचा समावेश आहे. युक्रेनवर रशियाच्या क्रूर आणि अप्रत्यक्ष हल्ल्यामुळे ऊर्जा बाजारावार परिणाम झाला आहे. ही फक्त सुरुवात आहे, पुढील 3 वर्षांमध्ये I2U2 गट नवीन पायाभूत सुविधा प्रकल्प ओळखण्यासाठी काम करणार आहे. ज्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो आणि एकत्रितपणे विकसित करू शकतो. जर आपण एकत्र राहिलो तर आपण खूप काही करू शकतो.

तर, इस्रायलच्या पंतप्रधान म्हणाले की, संसाधने एकत्र कशी आणायची हे माहित असलेल्या देशांद्वारेच खरा तोडगा निघेल. जगाच्या भल्यासाठी हे बदलणे गरजचे आहे. त्यासाठी खाजगी बाजाराला सहभागी बनवणे हे आमचे ध्येय असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान यायर लॅपिड म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: गणेश नाईक हजार 25 हजार 52 एवढ्या मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT