iaf First C-295 in possession of India aircraft received by Air Force Chief in Spain sakal
देश

C-295 : पहिले ‘सी-२९५’ भारताच्या ताब्यात; स्पेनमध्ये हवाई दलप्रमुखांनी विमान स्वीकारले

एअरबस डिफेन्स अँड स्पेस या कंपनीने आज ‘सी-२९५’ हे मालवाहू विमान भारतीय हवाई दलाच्या ताब्यात दिले

सकाळ वृत्तसेवा

सेव्हिल (स्पेन) : एअरबस डिफेन्स अँड स्पेस या कंपनीने आज ‘सी-२९५’ हे मालवाहू विमान भारतीय हवाई दलाच्या ताब्यात दिले. याबरोबरच, करारानुसार एकूण ५६ ‘सी-२९५’ विमाने भारताला मिळण्यास सुरुवात झाली आहे. हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी एअरबसच्या स्पेनमधील सेव्हिली येथील निर्मिती केंद्रावर जाऊन हे विमान स्वीकारले.

भारतीय हवाई दल अधिक सुसज्ज करण्यासाठी एअरबस कंपनीबरोबर दोन वर्षांपूर्वी झालेल्या २१ हजार ९३५ कोटी रुपयांच्या करारानुसार भारताला एकूण ५६ ‘सी-२९५’ विमाने मिळणार आहेत. पुढील दोन वर्षांत त्यापैकी १६ विमाने ही तयार अवस्थेत मिळणार आहेत. त्यानंतरची ४० विमाने ही टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स (टीएएसएल) या कंपनीद्वारे भारतात उत्पादित केली जाणार आहेत.

‘टीएएसएल’ आणि ‘एअरबस’ यांच्यात झालेल्या औद्योगिक भागीदारीनुसार हे उत्पादन केले जाणार आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बडोदा येथे ‘सी-२९५’ विमानांची निर्मिती करणाऱ्या केंद्राचे भूमिपूजन केले होते. भारतात प्रथमच एक खासगी कंपनी भारतीय हवाई दलासाठी विमान तयार करणार आहे. हवाई दलाकडील एव्हरो-७४८ ही मालवाहू विमाने सहा दशकांपूर्वी सेवेत दाखल झाली होती. त्यांची जागा ही नवी विमाने घेणार आहेत.

वैमानिकांना प्रशिक्षण

भारतासाठी बनविलेल्या पहिल्या सी-२९५ विमानाची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी झाली आहे. दुसरे विमानही तयार होण्याच्या टप्प्यावर असून पुढील वर्षी मे महिन्यात ते भारतीय हवाई दलाला मिळेल. हवाई दलाचे सहा वैमानिक आणि २० तंत्रज्ञांना सेव्हिली येथे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. बडोदा येथील निर्मिती केंद्रही पुढील वर्षी नोव्हेंबरपर्यंत सुरु होणार आहे.

सी-२९५ ची वैशिष्ट्ये

  • दुर्गम ठिकाणीही सैनिकांना नेण्याची क्षमता

  • एका वेळी ७१ सैनिकांना त्यांच्या सामानासह नेता येणार

  • हवेतूनच सैनिकांना पॅराशूटद्वारे खाली सोडण्याची सोय

  • आपत्कालीन परिस्थितीत बचाव मोहीम राबविण्यासाठी उपयुक्त

  • समुद्रावर गस्तही घालण्यास उपयोगी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT