IAS Officer Success Story : तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. अगदी कोणत्याही अडचणींना मात करून तुम्ही यशाची उंची गाठू शकता. आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने स्व-अभ्यासाच्या जोरावर देशातील सर्वात कठीण UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि IAS अधिकारी बनले.
आज आपण जाणून घेणार आहोत IAS अधिकारी अंशुमन राजबद्दल. अंशुमन राज हे बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहणारे रहिवासी. गावातील नवोदय विद्यालयातून त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. रॉकेलच्या दिव्यात बसून त्यांनी दहावीपर्यंत अभ्यास केला. यानंतर ते बारावीच्या अभ्यासासाठी जेएनव्ही रांची येथे गेले.
अत्यंत साध्या कुटुंबात जन्माला आलेले अंशुमन राज
अंशुमन राज अतिशय साध्या कुटुंबातून आणि पार्श्वभूमीत जन्माला आले, ते ज्या ठिकाणी राहायचे तेथे कायमच सुविधांचा अभाव होता. UPSC ची नागरी सेवा परीक्षाही त्यांनी मेहनतीने आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने उत्तीर्ण केली.
दोनदा क्रॅक केली UPSC
अशुमन यांनी स्वयंअध्ययनातून UPSC परीक्षेची तयारी करण्याचा विचार केला आणि पहिल्याच प्रयत्नात देशातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांच्या रँकनुसार त्यांना IRS पद देण्यात आले असले तरी हे पद मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा परीक्षा देण्याचा विचार केला कारण त्यांचे खरे उद्दिष्ट आयएएस अधिकारी बनण्याचे होते.
यानंतर त्यांनी सलग दोनदा यूपीएससीची परीक्षा दिली, पण या दोन्ही प्रयत्नात त्यांना यश मिळाले नाही. मात्र खचून न जाता त्यांनी तयारी सुरूच ठेवली. 2019 मध्ये, त्यांनी पुन्हा UPSC नागरी सेवा परीक्षा चौथ्या प्रयत्नात कुठलेही कोचिंग क्लासेस न लावता उत्तीर्ण केली आणि AIR-7 रँक मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले. (IAS Officer)
यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांत धैर्य असणे फार महत्वाचे आहे. काळजीपूर्वक आणि मनपूर्वक अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास या परीक्षेत यश मिळतंच. कठीण परिस्थितीत अभ्यास करणाऱ्या आयएस अधिकाऱ्यांकडून अनेक विद्यार्थी प्रेरणा घेत दरवर्षी यूपीएससीचा अभ्यास करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.