भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात ICMR च्या पाँडेचेरी इथल्या संशोधन केंद्रात एक अनोखं संशोधन झालं आहे. डासांना मारणाऱ्या विषाणूच्या एका प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. हा विषाणू इतर कोणत्याही प्राण्याला इजा न पोहोचवता डास आणि काळ्या माश्यांची अंडी नष्ट करतो.
हा बीटीआय (Bti strain VCRC B-17) प्रजातीचा विषाणू पर्यावरण आणि इतर प्राण्यांना कोणतीही इजा करत नाही. डास मारण्यासाठी हा विषाणू अनेक वर्षांपासून वापरला जात आहे. या संशोधन केंद्राचे संचालक डॉ. अश्वनी कुमार यांनी या संशोधनाविषयी माहिती दिली आहे. ते म्हणाले, "या विषाणूचं वैशिष्ट्य असं की हा विषाणू इतर कोणत्याही कीटकांना, किंवा प्राण्यांना इजा पोहोचवत नाही. तो फक्त डास आणि काळ्या माश्यांची अंडी नष्ट करतो. विषाणूच्या या प्रजातीची पूर्णपणे चाचणी केलेली आहे आणि तिला आता भारतीय प्रजातीचा दर्जाही दिला आहे. आत्तापर्यंत या तंत्रज्ञानाचा परवाना २१ कंपन्यांना देण्यात आला आहे."
भारत सध्या चिकनगुनिया, मलेरिया, फिलारियासिस, डेंग्यू, झिका अशा डासांपासून होणाऱ्या आजारांशी लढत आहे. या विषाणू तंत्रज्ञानाचा शोध हे या लढाईतलं मोठं पाऊल ठरणार आहे. गेल्या महिन्यात केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी हे बीटीआय तंत्रज्ञान हिंदुस्तान इनसेक्टिसाईड्सकडे व्यावसायिक उत्पादन आणि वापरासाठी सोपवण्यात आलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, संसर्गजन्य आजारांपैकी १७ टक्के आजार हे डासांमुळे होतात. ज्यामुळे वर्षाला सात लाख मृत्यू होतात. बीटीआय़ तंत्रज्ञानाचं बाजारमूल्य सध्या भारतात वार्षिक एक हजार कोटी रुपये इतकी आहे. मे महिन्यापर्यंत यंदाच्या वर्षी देशात १०,१७२ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत, तर तिघांचा मृत्यू झाला आहे. जून महिन्यापर्यंत चिकनगुन्याचे १,५५४ रुग्ण आढळले आहेत. तर एप्रिलपर्यंत २१,५५८ जणांना मलेरिया झाला असून चौघांचा मृत्यू झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.