ICMR esakal
देश

रुग्णालयातील रुग्णांमध्ये 6 पेक्षा जास्त प्राणघातक विषाणू; अहवालातून धक्कादायक खुलासा

Klebsiella विषाणु निरोगी लोकांमध्ये आढळत नाहीत

सकाळ डिजिटल टीम

देशातील 39 हॉस्पीटलमध्ये भर्ती असलेल्या रूग्णांमध्ये 6 पेक्षाजास्त जिवघेणे विषाणु आढळले आहेत. महत्त्वाचे म्हणजे नॉन-कोविड रुग्णांमध्येही हे आढळून आले आहेत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या एपिडेमियोलॉजी विभागाने अँटीमायक्रोबियल सर्व्हिलन्सच्या रिपोर्टमध्ये हे उघड झाले आहे. एस्चेरिचिया कोलाय बॅक्टेरिया सगळ्येत जास्त रुग्णांमध्ये आढळून आला आहे.

क्लेबसिएला, एसिनेटोबेक्टर बामनिया, स्यूडोमोनास एरुगिनोसा व स्टैफिलोकोकस ऑरियस सारखे विषाणु सापडले आहेत. जानेवारी ते डिसेंबर 2021 याकाळात, दिल्ली एम्ससारख्या वैद्यकीय संस्थांमध्ये दाखल झालेल्या 95728 रुग्णांच्या तपासणीच्या आधारे हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.

ICU मध्ये Klebsiella विषाणुचा धोका

Klebsiella विषाणु निरोगी लोकांमध्ये आढळत नाहीत. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना याचा धोका जास्त असतो. महत्त्वाच म्हणजे ICU मध्ये संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दाखल झालेल्या लाखो रुग्णांमध्ये क्लेबसिएला बॅक्टेरिया असण्याची शक्यता होती.

रक्तप्रवाह आणि लघवीच्या संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे

महामारीमध्ये रक्त आणि लघवीचे संक्रमण सर्वात जास्त दिसून आले. रक्त संक्रमणामुळे मृत्यूचे प्रमाण 30 टक्क्यांहून अधिक आणि मूत्र संसर्गामुळे 28 टक्के इतकी आहे. गंभीर स्थिती आणि इतर वैद्यकीय कारणे देखील मृत्यूमागे असू शकतात.

49 टक्के रुग्णांमध्ये साल्मोनेला आणि शिगेला

जास्तीत-जास्त रुग्णांमध्ये आतड्यांसंबंधी जीवाणू नोंदवले गेले आहेत. यामध्ये साल्मोनेला आणि शिगेला (49.5 टक्के) यांचा समावेश आहे. तर बॅसिली (27.4 टक्के), स्टॅफिलोकॉसी (12 टक्के), एन्टरोकोकी (5.9 टक्के), बुरशी (3.6 टक्के), टायफॉइड साल्मोनेला (0.5 टक्के) आणि स्ट्रेप्टोकॉकी (0.4 टक्के) जीवाणूही आढळून आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: स्मशानातील लाकडांवर रक्ताचे डाग; दोघांनी मिळून केला होता खून, पोलिसांनी 'असा' लावला छडा

'ही' नक्कल केल्यामुळे महाराष्ट्रात भाजपचा विजय झाला; कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमारांनी सांगितलं कारण

Solapur South Assembly Election Result 2024 : आघाडीतील बिघाडी ठरली ‘दक्षिण’च्या यशाची गुरूकिल्ली

MLA Chetan Tupe Patil : हडपसर विधानसभा नवनिर्वाचित आमदार चेतन तुपे पाटील विकासाचे ‘रोल मॉडेल’ पुढे आणणार

Vijay Rashmika Viral Photos : विजय-रश्मिकाच्या रिलेशनशिपचे गुपित उघड? रेस्टॉरंटमध्ये दोघेही एकत्र जेवताना दिसले

SCROLL FOR NEXT