भारत हा सर्वधर्म समभाव जरी देश असला तरी इथे कुठे ना कुठे कुठल्या तरी घटकाला असमानता, भेदभावाचा सामना करावा लागतो. जात-पात, धर्म, वर्ग किंवा व्यवसाय या वरुन लोकांच्या मानसिकतेत आजही भेद आढळून येतोय. सध्या या गोष्टीचा प्रत्यय लिफ्टच्या बाहेरील चर्चेत असलेली एक पाटी देते.
सध्या सोशल मीडियावर एक पाटी खुप वायरल होतेय. या पाटीवर साधारणपणे कुठलीही जनहीतार्थ माहिती किंवा सुचना लिहली नसून यावर एक वादग्रस्त विधान लिहीलेत. या पाटीवर लिहीले आहेत, "मोलकर, चालक किंवा डिलीव्हरी बॉइजनी जर मुख्य लिफ्ट वापरल्यास ३०० रूपयांचा दंड आकारला जाईल." पाटीवरील ही सुचना पाहल्यावर अनेकांच्या मनात संताप निर्माण होईल. एका फोटोजर्नलिस्ट हर्ष वडलामणी यांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरून ही पाटी पोस्ट केली आहे. ही पाटी हैदराबादच्या कुठल्यातरी लिफ्ट च्या बाहेर लावलेली आढळली.
खरं तर या पाटीवरून जनसामान्यातून रोष व्यक्त केला जातोय. मोलकर, चालक किंवा डिलीव्हरी बॉइज हे समाजाचा अविभाज्य घटक आहे. त्यांच्यासोबत होत असलेला हा दुरव्यव्हार अशोभनीय आहे. जिथे एकिकडे आपण विकासाच्या दिशेने पावले टाकत आहोत मात्र दुसरीकडे अशा घटनेमुळे वैचारीक मानसिकतेत अधोगती दिसून येत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.