Narendra Modi sakal
देश

PM Modi : ''तोंड उघडले तर सात पिढ्यांचा हिशोब निघेल'', पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

सकाळ वृत्तसेवा

होशियारपूर (पंजाब) : ‘‘सध्या मी गप्प बसलो आहे, ज्यादिवशी तोंड उघडेल, तेव्हा तुमच्या सात पिढ्यांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडेन, ’’असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी होशियारपूर येथील सभेतून दिला. ‘इंडिया’ आघाडीचे लोक मला नवनवीन दुषणं देतात. कॉंग्रेसने तर भ्रष्टाचारात डबल पीएचडी मिळवली. आता तर आम आदमी पक्षही त्यात सामील झाला आहे, अशी टीका मोदी यांनी केली.

पंजाबमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मेादी यांनी होशियारपूरच्या रामलीला मैदानात सभा घेतली. होशियारपूरच्या भाजपच्या उमेदवार अनिता सोमप्रकाश आणि आनंदपूर साहिबचे उमेदवार सुभाष शर्मा यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मोदी बोलत होते. ते म्हणाले, माझ्या गप्प बसण्यामागे कमकुवतपणा समजू नका. मी सध्या गप्प बसलो आहे. ज्यादिवशी तोंड उघडेल, त्यादिवशी तुमच्या सात पिढ्यांचा हिशोब बाहेर काढला जाईल. ‘इंडिया’ आघाडीचे लोक जवानांचा अपमान करतात. त्यांनी जनरल बिपिन रावत यांना गल्लीतला गुंड म्हणून म्हटले होते.

हा लष्कराचा अवमान होता. कॉंग्रेसच्या राजवटीत लष्कराला कमकुवत करण्यात त्यांनी कोणतीही कसर ठेवली नव्हती. तेजस लढाऊ विमानांच्या निर्मितीचा प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवला होता. आमच्या सरकारने वन रँक वन पेन्शनसाठी सव्वा लाख कोटी रुपये खर्च केले. भारतीय लष्कर अधिकाधिक सुसज्ज आणि अत्याधुनिक करणे हे आमच्या सरकारचे ध्येय आहे. लष्कर हे २६ जानेवारीच्या संचलनासाठी नाही तर शत्रूचा सामना करण्यासाठी तयार केले जाते. मला काहीही बोला, परंतु देशाच्या लष्कराचा अपमान आपण सहन करणार नाहीत. आदमपूर विमानतळाला गुरू रविदास यांचे नाव दिले जाईल, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली.

गरिबांचे कल्याण करणे मोदी सरकारचे प्राधान्य राहिले आहे आणि यात गुरू रविदास यांची प्रेरणा आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत आमच्या सरकारने एक क्षणही वाया घालवला नाही. सरकार स्थापन होताच पुढील १२५ दिवसांत काय करणार, याचा आराखडा तयार केला आहे. यातही २५ दिवस तरुणांवर भर दिला जाणार आहे. पुढील पाच वर्षांत कोणते मोठे निर्णय घ्यायचे आहेत, याचीही तयारी केली आहे. पुढील २५ वर्षाच्या नियोजनावर आमचे सरकार वेगाने काम करत आहे, असे मोदी म्हणाले.

ते म्हणाले, कॉंग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीच्या स्वार्थी आणि मतांच्या राजकारणाने देशाचे खूप नुकसान झाले आहे. मतपेढीवर असणाऱ्या प्रेमामुळे देशाच्या फाळणीच्या वेळी कर्तारपूर साहिबवर आपला हक्क दाखवता आला नाही.

याच लोकांनी मतपेढीसाठी सतत राम मंदिराचा विरोध केला आहे. लांगुलचालनाच्या राजकारणामुळे ‘‘इंडिया’ आघाडी सीएएला विरोध करत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून मोदी सरकारने अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसीच्या आरक्षणाचे संरक्षण केले आहे. माझ्या प्रयत्नांवर कॉंग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडी नाराज आहे. त्यांचा आरक्षणविषयक दृष्टिकोन धोकादायक आहे. आरक्षण काढून घेण्याचीच भूमिका त्यांची वेळोवेळी दिसून आली, असे मोदी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Bye Poll: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून ‘या’ नावावर एकमत! पक्षाच्या स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीत काय झाली चर्चा?

Sports Bulletin 15th October 2024: ICC हॉल ऑफ फेमध्ये तीन दिग्गजांचा समावेश ते भारत-न्यूझीलंड कसोटीच्या वेळेत बदल

Justice Idol: कायदा आता आंधळा नाही! न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल; डोळ्यांवरील पट्टी हटवली अन्..., सरन्यायाधिशांचा मोठा निर्णय

Shyam Manav: श्याम मानव यांच्या ‘संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव’ सभेत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

Latest Maharashtra News Updates : बीएमसीने 17-18 ऑक्टोबर रोजी मुंबईत 5-10 टक्के पाणीकपात जाहीर केली

SCROLL FOR NEXT