iit madras analysis r value in India further reduces corona peak likely in next 14 days 
देश

कोरोना कमकुवत होतोय?; सलग दुसऱ्या आठवड्यात घसरली 'आर व्हॅल्यू'

सकाळ डिजिटल टीम

कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे, गेल्या चार दिवसांपासून तर भारतात तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत, बहुतेक विश्लेषकांचे मत आहे की, भारतात कोरोनाने उच्चांक गाठला आहे. दरम्यान, आयआयटी मद्रासच्या (IIT Madras) विश्लेषणातून एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. त्यानुसार 'आर व्हॅल्यू' (R-Value) मध्ये सलग दोन आठवडे घसरण झाली आहे.

सध्या, 14 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान देशातील सरासरी आर व्हॅल्यू 1.57 वर आली आहे, जो कोरोना (Corona) पासून दिलासा मिळण्याचे लक्षण आहे. याआधी, डिसेंबर 2020 आणि जानेवारी 2021 या दोन आठवड्यात देशात 'आर व्हॅल्यू'मध्ये सातत्याने वाढ झाल्यानंतर, गेल्या आठवड्यात म्हणजेच 7 ते 13 जानेवारी रोजी पहिल्यांदाच यामध्ये घट नोंदवण्यात आली होती. आर व्हॅल्यू जितके कमी असेल तितका संसर्ग दर कमी होतो

आर व्हॅल्यू म्हणजे काय? (What is R-Value?)

सोप्या वैज्ञानिक भाषेत समजून घ्यायचे झाल्यास आर व्हॅल्यू म्हणजे एखाद्या संक्रमित व्यक्तीने इतरांना संक्रमित करण्याच्या क्षमता होय. आर-व्हॅल्यू करोना विषाणू किती वेगाने पसरतो हे दर्शवते. म्हणजेच, जर कोरोना संक्रमित व्यक्तीचे आर व्हॅल्यू एक असेल तर त्याच्याकडून दुसर्‍या व्यक्तीला संसर्ग होण्याचा धोका असतो. दुसरीकडे, जर एखाद्या व्यक्तीचे आर मूल्य तीन असेल तर तो तीन लोकांसाठी धोका निर्माण करू शकतो. कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत असताना, मानसांची आर व्हॅल्यू जास्त असते आणि हा वाढता आकडा थांबवण्यासाठी सरकार निर्बंध-कर्फ्यू किंवा लॉकडाऊन सारखी पावले उचलते.

डिसेंबरमध्ये संपूर्ण भारतात आर व्हॅल्यू 2.9 वर

25 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत संपूर्ण भारतात आर व्हॅल्यू 2.9 वर पोहोचली होती असे सांगण्यात आले आहे , तर 1 जानेवारी ते 6 जानेवारीपर्यंत हा आकडा 4 वर पोहोचला होता. म्हणजेच या काळात सरासरी एक कोरोना बाधित व्यक्ती त्याच्यासोबत आणखी चार कोरोना लोकांना संक्रमित करु शकत होता. तज्ञांच्या मते, प्रत्येक नमुन्याचे जीनोम सिक्वेन्सिंग करणे शक्य नाही, परंतु विषाणूची ही लहर प्रामुख्याने ओमिक्रॉनमुळे आहे, यावर तज्ञ भर देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT