IIT_Madras 
देश

IIT मद्रास लॉकडाउन; १०० जणांना कोरोनाची बाधा झाल्याने सर्व विभाग बंद!

सकाळ न्यूज नेटवर्क

IIT Madras: चेन्नई : आयआयटी मद्रासच्या वस्तीगृहात कोरोना संसर्गाचा फैलाव झाल्याने संस्थेतील ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि विभाग तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयआयटी मद्रासला सध्या हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आले आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांना इ-मेलद्वारे सूचना देण्यात आली आहे. आतापर्यंत १०० हून अधिक जणांना लागण झाली असून त्यातील बहुतांश विद्यार्थी आहेत. आजपर्यंत ४४४ जणांचे नमुने तपासले असून त्यापैकी १०४ विद्यार्थ्यांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या ९ वस्तीगृहात ७०० विद्यार्थी राहत असून ते संशोधक आहेत.

राज्य सरकारच्या आदेशानुसार अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ७ डिसेंबरपासून वर्ग सुरू करण्यात आले. मात्र कोरोना संसर्ग झाल्याने सर्व विभाग बंद करण्यात आले. कॅम्पसमध्ये प्रारंभी १ डिसेंबरला पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर १० डिसेंबर आणि आता १४ डिसेंबरला काही जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. तीन दिवसात ५५ जणांना लागण झाली आहे. त्यामुळे इन्स्टिट्यूटचा परिसर हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आला. कॅम्पसमध्ये ७७४ विद्यार्थी असून सर्वांची चाचणी केली जात आहे. त्यांना कॅम्पसबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्वाधिक रुग्ण कृष्णा आणि जमुना वस्तीगृहात आढळून आले आहेत. याशिवाय काही विभागाचे कर्मचारी बाधित असल्याचे निदर्शनास आले.

आयआयटी मद्रास संस्थेच्या निवेदनानुसार, वस्तीगृहात सध्या दहा टक्केच विद्यार्थी राहत असून त्यांची तपासणी केली जात आहे. कोरोनामुळे वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना सिलबंद जेवणाचा पुरवठा केला जात आहे. कोविडसंदर्भात एसओपी लागू करण्यात आली आहे. सध्याच्या काळात किती विद्यार्थी एकावेळी प्रयोगशाळेत काम करू शकतात, यावर विचार केला जात आहे. काही विद्यार्थ्यांनी वस्तीगृहात परत येण्याबाबत विनंती केली होती आणि ती प्रशासनाने मान्यही केली आहे. मात्र यासाठी नियमानुसारच विद्यार्थ्यांना वस्तीगृहात किंवा वेगळे राहावे लागणार आहे. तसेच प्रयोगशाळेसाठीही त्यांना ठराविक दिवशीच अनुमती दिली जाणार आहे. आयआयटीचे वर्ग ऑनलाइन सुरू असून आयआयटी-एमला देखील अधिकारी भेय देणार आहेत.
तमिळनाडूचा आकडा घसरला.

चेन्नईचे आरोग्य अधिकारी संस्थेच्या संपर्कात असून विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले आहे. दरम्यान, तमिळनाडू तसेच चेन्नईतील कोविडचा आकडा घसरला आहे. काल राज्यात नव्याने ११९५ रुग्ण आढळून आले. त्यात चेन्नईच्या ३४० जणांचा समावेश आहे. राज्यात बाधितांची संख्या ८ लाखांवर असली तरी सध्या केवळ १० हजार रुग्णांवरच उपचार सुरू आहेत.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

IND vs AUS: 'विराट किंवा रोहितचा फॉर्म नव्हे, तर गौतम गंभीर ही टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या'; वाचा कोण म्हणतंय असं

Chh. Sambhajinagar : चेकपोस्टवर पाच कोटींची रक्कम जप्त....परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांमध्ये निवडणुकीसंदर्भात पोलिसांची दक्षता

'डॉ. आंबेडकरांचं संविधान धोक्यात आलंय, दलित समाजाला आता त्यांचं भावनिक भाषण नकोय'; समरजित घाटगेंचा हल्ला

SCROLL FOR NEXT