अटक google
देश

UP बेकायदेशीर धर्मांतराचं बीड कनेक्शन; तिघांना अटक

नामदेव कुंभार

उत्तर प्रदेशातील बेकायदा धर्मांतर प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर आलेलं आहे. उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी रात्री बेकायदा धर्मांतर प्रकरणी आणखी तिघांना अटक केली आहे. यामध्ये बीडमधील एका आरोपीचा समावेश आहे. प्रलोभने दाखवून जबरदस्तीने धर्मांतर करणे भाग पाडणाऱ्या टोळीच्या कारवाया उत्तर प्रदेशमधील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) उघडकीस आणल्या होत्या. याआधी उमर गौतम आणि जहाँगीर आलम यांना अटक करण्यात आली होती. सोमवारी यात आणखी तिघांची भर पडली आहे.

एटीएसने सोमवारी मन्नू यादव उर्फ अब्दुल, इरफान शेख आणि राहुल भोला या तिघांना अटक केली आहे. यामधील इरफान शेख हा महाराष्ट्रातील बीडमधील असल्याचं समोर आलं आहे. यामुळे उत्तर प्रदेशमधील धर्मांतर प्रकरणाचे धागेदोरे बीडपर्यंत पोहोचले आहेत. पोलीस सध्या उपर गौतम याने आपल्या आयडीसी संस्थेमार्फत केलेल्या धर्मांतराची माहिती घेत आहेत, असं उत्तर प्रदेशचे अतिरिक्त महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

मूकबधिर मुलं आणि महिलांचं धर्मांतर केल्याप्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आलं आहे. या सर्वांनी एक हजार पेक्षा जास्त लोकांचं धर्मांतर केलं असल्याचं उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान या धर्मांतर प्रकरणात महाराष्ट्रातील बीडचं कनेक्शनही समोर आलं आहे. सोमवारी धर्मांतर प्रकरणी अटक केलेला इरफान शेख हा बीड जिल्ह्यातील असल्याचं समजतेय. इरफान शेख सध्या केंद्र सरकारच्या बाल कल्याण मंत्रालयातील कर्मचारी असल्याचीही माहिती मिळत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेरोजगार, गरीब कुटुंब आणि मूक बधिर लोकांचे धर्मांतरण करण्यात येत होते. याप्रकरणी यूपी एटीएसने दोन आरोपींना दिल्लीतून अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांना लाच देऊन त्यांचे धर्मांतरण करण्यात येत होते. धक्कादायक बाब म्हणजे, या धर्मांतरणासाठी आयएसआय फंडिंगचे प्रकरणही समोर आले आहे. कतार, अबुधाबी आणि रियाध येथून आतापर्यंत 50 लाख रुपयांची देवाण घेवाण केल्याचं समोर आलं. “आरोपी उमर गौतम याने परदेशातून पैसे मिळवताना आपलं खासगी तसंच कुटुंबाच्या बँक खात्याचा वापर केला आहे. हे स्पष्टपणे परदेशी चलन नियमन कायद्याचं उल्लंघन आहे,” अशी माहिती प्रशांत कुमार यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT