dsp surendra singh  
देश

डीएसीपींच्या हत्येनंतर पोलीस प्रशासन आक्रमक; म्हणाले खाण माफियांवर...

सकाळ डिजिटल टीम

नूह - हरियाणातील मेवातमधील नूह येथे अवैध खाण माफियांनी डीएसपी सुरेंद्र सिंह बिश्नोई यांची हत्या केली. खाण माफियांनी डीएसपीवर डंपर चढवला. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने हरियाणात खळबळ माजली आहे. (DSP Surendra Singh News in Marathi)

मिळालेल्या माहितीनुसार, खाणकाम थांबवण्यासाठी गेलेल्या डीएसपी सुरेंद्र सिंह यांनी अवैध दगडांनी भरलेला ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला असता खाण माफियांच्या लोकांनी डीएसपी सुरेंद्र यांच्यावर डंपर घातला. या घटनेनंतर नुहचे एसपी आणि आयजी यांनी आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. या घटनेनंतर हरियाणाचे एडीजी संदीप खेडवाल म्हणाले की, पोलिसांना घटनेची माहिती 12 वाजण्याच्या सुमारास मिळाली होती. ते पुढं म्हणाले की, यापूर्वीही खाण माफियांवर कारवाई झाली होत आणि यापुढेही कारवाई होतच राहिलं, असही ते म्हणाले.

दरम्यान पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र सिंह तबडूमध्ये होते. त्याचवेळी तबडूच्या टेकडीवर अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर सुरेंद्र सिंह तिथं छापा टाकण्यासाठी गेले. तिथं गेल्यावर सुरेंद्र हे त्यांच्या गाडीजवळच उभे होते. त्याचवेळी एक डंपर वेगाने येऊन त्यांना धडक दिली. याचवर्षी सुरेंद्र सिंह निवृत्त होणार होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयी उमेदवाराचे औक्षण करताना रसायनयुक्त गुलालामुळे उडाला भडका; सहा ते सात कार्यकर्ते भाजले, नेमकं काय घडलं?

Mahayuti Strike Rate: महायुतीचा जबरदस्त स्ट्राइक रेट! काय ठरले निर्णायक? विरोधकांचं झालं पानीपत

IND vs AUS 1st Test : नाद करा, पण Yashasvi Jaiswal चा कुठं? ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी धुतले; गावस्कर, तेंडुलकर, कांबळी यांच्याशी बरोबरी

Latest Maharashtra News Updates : राज्याचा निकाल आधीच ठरला होता, नंतर निकालाचं चित्र बदललं; महायुतीच्या विजयानंतर संजय राऊतांचा आरोप

खोट्या अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध ए आर रहमानने जारी केली कायदेशीर नोटीस ; "या अफवेमुळे माझ्या कुटूंबाला त्रास..."

SCROLL FOR NEXT