Rainfall Alert esakal
देश

Rainfall Alert : हवामान खात्यानं टेन्शन वाढवलं; 'या' 17 राज्यांत पुढील दोन दिवस कोसळणार मुसळधार पाऊस?

सध्या भारतात अफगाणिस्तान आणि इराणमधून उष्णतेची लाट येण्यास उशीर झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

3 एप्रिलपर्यंत ईशान्य भारतातील राज्यांमध्ये जोरदार वारे, गडगडाट आणि वीज पडण्याची शक्यता आहे. इथं मुसळधार पाऊसही पडू शकतो.

Rainfall Alert : एप्रिल महिना सुरू होण्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक उरलाय. यंदा उन्हाळाही उशिरा सुरु होणार असल्याचं चित्र आहे.

पुढील काही दिवस संपूर्ण उत्तर भारतात मुसळधार पावसाची (Heavy Rain in North India) शक्यता हवामान खात्यानं (Meteorology Department) वर्तवलीये.

सध्या भारतात अफगाणिस्तान आणि इराणमधून उष्णतेची लाट येण्यास उशीर झाला आहे. आयएमडीनं राजस्थान आणि जम्मू-काश्मीरसह 17 राज्यांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यात दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील राज्यांचाही समावेश आहे. हिमाचल, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पूर्व राजस्थानमध्ये दोन दिवस हवामानात बदल जाणवणार आहे.

IMD च्या माहितीनुसार, पुढील दोन आठवडे देशात उष्णतेची लाट असणार नाहीये. यामागं दोन वेस्टर्न डिस्टर्बन्स हे मुख्य कारण आहे. IMD नं पुढील दोन दिवस संपूर्ण उत्तर भारतात मुसळधार पाऊस आणि अनेक राज्यांमध्ये गारपीट होण्याचा अंदाज वर्तवलाय.

हिमाचल प्रदेश, पंजाबमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. यासोबतच पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट होऊ शकते. जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर तामिळनाडू, केरळ आणि तेलंगणामध्येही पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो. कर्नाटकचा काही भाग वगळता दक्षिण भारतातील सर्व राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पूर्वेकडील राज्यांत 3 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता

IMD नुसार, 3 एप्रिलपर्यंत ईशान्य भारतातील राज्यांमध्ये जोरदार वारे, गडगडाट आणि वीज पडण्याची शक्यता आहे. इथं मुसळधार पाऊसही पडू शकतो. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT